संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आत्मनिर्भर भारत: भारतीय नौदलासाठी 1,700 कोटी रुपये किमतीची 13 Lynx-U2 आग नियंत्रण प्रणाली खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने केला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बरोबर करार

Posted On: 30 MAR 2023 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मार्च 2023

 

भारतीय नौदलासाठी बाय (buy) (इंडियन- आयडीएमएम, अर्थात भारतात डिझाईन, विकसित आणि उत्पादित) श्रेणी अंतर्गत, एकूण रु. 1,700 कोटी पेक्षा जास्त किमतीची 13 Lynx-U2 फायर कंट्रोल (आग नियंत्रण) प्रणाली खरेदी करण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाने 30 मार्च 2023 रोजी, बंगळूरू इथल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बरोबरच्या करारावर स्वाक्षरी केली. Lynx-U2 प्रणाली, ही एक नेव्हल गन फायर नियंत्रण प्रणाली असून, ती भारतात डिझाईन आणि विकसित केली आहे. ही प्रणाली खवळलेल्या समुद्रात अथवा हवेत/जमिनीवरील लक्ष्याचा अचूक शोध घेऊन त्याचा वेध घेण्यासाठी सक्षम आहे.

ही फोर्थ जनरेशन आणि पूर्णपणे देशांतर्गत विकसित प्रणाली, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड इथे बनवल्या जाणार्‍या, स्वदेशी बनावटीच्या, खोल समुद्रात तैनात केल्या जाणाऱ्या अत्याधुनिक गस्ती नौकांवर स्थापन केली जाईल. या निर्णयामुळे, चार वर्षांच्या कालावधीत दोन लाख मनुष्य-दिवसांचा रोजगार निर्माण होईल, तसेच एमएसएमई (सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग) सह विविध भारतीय उद्योगांच्या सक्रीय सहभागाला प्रोत्साहन देईल. ज्यायोगे, संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ बनण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमध्ये मोठी भर पडेल.

 

* * *

R.Aghor/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1912227) Visitor Counter : 219