संरक्षण मंत्रालय

प्रादेशिक सुरक्षा, स्थैर्य आणि संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी भारत आफ्रिकी राष्ट्रांसोबत काम करत राहील, असे संरक्षण मंत्र्यांचे पुण्यातील पहिल्या भारत-आफ्रिका लष्कर प्रमुखांच्या परिषदेत प्रतिपादन


राजनाथ सिंह यांनी आफ्रिकी कंपन्यांना त्यांच्या संरक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानाची चाचपणी करण्यासाठी केले आमंत्रित

Posted On: 28 MAR 2023 4:30PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 28 मार्च 2023

 

प्रादेशिक सुरक्षेला चालना देण्यासाठी, स्थैर्य वाढवणे आणि संरक्षण क्षमता एकत्रितपणे वाढवण्याकरता भारत आफ्रिकी राष्ट्रांसोबत काम करत राहणार आहे. महाराष्ट्रात पुणे येथे 28 मार्च 2023 रोजी दुसऱ्या आफ्रिका-भारत संयुक्त सराव 'AFINDEX' च्या पार्श्‍वभूमीवर आयोजित भारत-आफ्रिका लष्कर प्रमुखांच्या पहिल्या परिषदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अशी माहिती दिली. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि 31 आफ्रिकी राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी तसेच इतर नागरी आणि संरक्षण क्षेत्रातील मान्यवर या परिषदेला उपस्थित होते.

आफ्रिकी भागीदार देशांना त्यांच्या सशस्त्र दलांच्या क्षमता वाढीसह, त्यांची आर्थिक वाढ आणि सामाजिक विकास सुनिश्चित करण्यासाठी संरक्षण संबंधित सर्व बाबींमध्ये पाठिंबा देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा राजनाथ सिंह यांनी पुनरुच्चार केला. देशाची सुरक्षा सुनिश्चित केली जाते, तेव्हाच देशाच्या प्रगतीची पूर्ण क्षमता साकारता येते यावर त्यांनी भर दिला.

आम्हाला विश्वास आहे की, जीवनाचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य, रोजगाराचा अधिकार, उपजीविकेचा अधिकार इत्यादी वैयक्तिक मानवी हक्कांचे जतन भक्कम आणि प्रभावी राज्यव्यवस्थेवरच अवलंबून असते. सुरक्षित आणि मजबूत शासनव्यवस्थाच कायद्याचे राज्य सुनिश्चित करू शकते तसेच आर्थिक वाढ आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देऊ शकते. सुरक्षित आणि संरक्षित वातावरणातच विकास होऊ शकतो. आपल्यापैकी अनेकांनी स्वातंत्र्यानंतर खूप लांब पल्ला गाठला असला तरी, असे अनेक आफ्रिकी देशात राज्यव्यवस्थेची क्षमता वाढवण्याचे काम अजूनही प्रगतीपथावर आहे, असे संरक्षण मंत्री म्हणाले. लोकांच्या गरजा आणि आकांक्षांची पूर्तता करू शकेल अशी मजबूत राज्यव्यवस्था उभारण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

एकविसाव्या शतकातील संरक्षणविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी आफ्रिकी राष्ट्रांच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण देण्यात आणि त्यांना आवश्यक कौशल्याने सुसज्ज करण्यात भारत आघाडीवर आहे. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये बंडखोरीविरोधी कारवाया, शांतता राखणे, सागरी सुरक्षा, सायबर युद्ध, ड्रोन कारवाया यांसारख्या नवीन क्षेत्रातील विशेष प्रशिक्षणासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

भारत आणि आफ्रिकी राष्ट्रांमधील संयुक्त सराव, सशस्त्र दलांना एकमेकांकडून शिकण्याची आणि आंतरकार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्याची उत्कृष्ट संधी प्रदान करते, असे संरक्षण मंत्री म्हणाले. ‘AFINDEX’ हे क्षमता विकसित करण्यासाठी आणि परस्पर क्षमता वाढवण्यासाठी भारताचे आफ्रिकी राष्ट्रांवर सातत्याने लक्ष केंद्रित करण्याचे निदर्शक असल्याचे ते म्हणाले.  हिंद महासागराने जोडलेले सागरी शेजारी म्हणून, सागरी सुरक्षा, जलविज्ञान, दहशतवाद आणि अतिरेक्यांना विरोध करणे आदी मुद्यांवर आपले सहकार्य प्रादेशिक शांतता आणि समृद्धीसाठी आवश्यक असेल असे ते म्हणाले.

संरक्षक साहित्य आणि मंच हा भारताचा आफ्रिकेबरोबरच्या लष्करी सहकार्याचा अजून एक पैलू आहे असे राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. आपली संरक्षण विषयक गरज भागवण्यासाठी आफ्रिकन देशांनी भारतीय बनावटीचे लष्करी साहित्य आणि तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरू शकेल, याची माहिती  करून घ्यावी असं सांगत त्यांनी आफ्रिकन देशांना भारतात आमंत्रण दिले. भारतीय जनता आणि आफ्रिकन जनता मिळून जगातील एक तृतीयांश मनुष्यबळ आहे. लोकसंख्येतील  ही असमानता  योग्य प्रकारे वापरले गेले पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले हे मनुष्यबळ वृद्धी आणि विकासाच्या कामी वापरावे असे त्यांनी यावेळी केले. अनेक आफ्रिकन देशांमध्ये जगातल्या कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक वेगाने लोकसंख्या वाढ होते. काहींच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत जगातील चार व्यक्तींमागे एक व्यक्ती आफ्रिकन असेल म्हणूनच, एकूण मानवतेचा विकास होण्यासाठी, आफ्रिकेचा विकास आवश्यक आहे.  आज आफ्रिका हे अब्जावधी उत्साही माणसांचे निवासस्थान आहे, त्यापैकी दोन तृतीयांश व्यक्ती पस्तीशीच्या आतल्या आहेत. या मानवी भांडवलाला योग्य संधी आणि सहाय्य दिल्यास हे मनुष्यबळ म्हणजे फक्त आफ्रिकेचे विकास इंजिन नाही तर संपूर्ण जगाचे विकासाचे इंजिन बनेल असेही त्यांनी नमूद केले. विकसनशील देशांना उच्च आर्थिक वृद्धी दर गाठू न देण्यास कारणीभूत असलेल्या अनेक गोष्टींपैकी संबंधित तंत्रज्ञान विषयक मागासलेपणा हे एक महत्त्वाचे कारण आहे.

नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान ही दरी एका उडीत पार करण्याची संधी देत आहे, असे सांगून भारताचे डिजिटल तसेच स्वच्छ आणि हरित तंत्रज्ञानामधील कौशल्य हे आफ्रिकन तंत्रज्ञानाला फायदेशीर ठरेल असेही त्यांनी नमूद केले.

आर्थिक क्रांतीचा उल्लेख करताना त्यांनी भारताने युनायटेड पेमेंट इंटरफेसच्या माध्यमातून सर्व नागरिकांचे आर्थिक व्यवहार एकत्र आणले याचा विशेष उल्लेख केला.

कल्पना आणि व्यवहारात आणलेल्या बाबींची देवाणघेवाण दोन्ही बाजूने होईल आणि आपल्या आफ्रिकन मित्र देशांकडून त्यांच्या अनुभवातून शिकण्यासाठी भारत नेहमीच सज्ज आहे असे ते म्हणाले.

भारत आफ्रिका लष्कर प्रमुखांची कॉन्क्लोन अमृत म्हणजे आफ्रिका इंडिया मिलिटरीज फॉर रिजनल युनिटी (स्थानिक एकात्मतेसाठी आफ्रिकन  भारतीय लष्कर ) या संकल्पनेवर आधारित होती.

स्थानिक पातळीवरील सहकार्या अंतर्गत भारतीय आणि आफ्रिकन देश यांच्यामधील संयुक्त ऊर्जा बळकट करणे आणि तिच्यात सुधारणा करणे हे या संकल्पनेमागील उद्दिष्ट होते.

भारतीय आणि आफ्रिकन देशांमध्ये भारतीय संरक्षण उद्योगाच्या प्रगती बरोबरच संयुक्त प्रशिक्षण आणि लष्करी सहकार्य या मार्फत एका संस्थात्मक आराखड्याची उभारणी करणे जेणेकरून संयुक्त लष्करी प्रशिक्षण , शांतता मोहिमा आखता याव्यात. भारत आणि आफ्रिकन देशांमधील स्थानिक स्तरावरील सहकार्याला खतपाणी घालण्याबरोबरच प्रादेशिक सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि आफ्रिका राष्ट्रांमध्ये आधीपासून असलेल्या संरक्षण संबंधांचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.

 

R.Aghor/Vinayak/Vijaya/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1911455) Visitor Counter : 335