अर्थ मंत्रालय
बहुस्तरीय विकास बँकांच्या बळकटीकरणासाठी जी 20 तज्ञ गट
Posted On:
28 MAR 2023 3:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मार्च 2023
भारताच्या जी -20 अध्यक्षतेखाली, "बहुस्तरीय विकास बँका (एमडीबी ) बळकट करणे" या विषयावर एक जी 20 तज्ञ गट स्थापन करण्यात आला आहे.
तज्ञ गटाची खालीलप्रमाणे उद्दिष्टे आहेत:
- शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तसेच हवामान बदल आणि आरोग्य संकट यांसारख्या मोठी व्याप्ती असलेल्या जागतिक आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीने, मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा करण्यासाठी बहुस्तरीय विकास बँका (एमडीबी )अधिक सुसज्ज असतील,या अनुषंगाने 21 व्या शतकासाठी अद्ययावत एमडीबी व्यवस्थेसाठी टप्पे आणि कालबद्धतेसह ,दृष्टीकोनापुरते मर्यादित न राहता एमडीबीच्या विकासासाठी सर्व पैलूंना स्पर्श करणारा ,प्रोत्साहन रचना, परिचालन दृष्टिकोन आणि आर्थिक क्षमता समाविष्ट असलेला मार्गदर्शक आराखडा तयार करणे
- खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्रातील निधी यांसारख्या महत्त्वाच्या स्त्रोतांसह सीएएफ शिफारशींमधून मिळू शकणारी अतिरिक्त क्षमता लक्षात घेऊन शाश्वत विकास उद्दिष्टे आणि जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी बँकांच्या आणि सदस्य देशांच्या वाढत्या वित्तपुरवठा गरजा पूर्ण करण्यासाठी बहुस्तरीय विकास बँकांच्या माध्यमातून (एमडीबी ) आणि त्यांच्याकडून आवश्यक असलेल्या निधीच्या प्रमाणात विविध अंदाजांचे मूल्यांकन करणे
- जागतिक विकास आणि इतर आव्हानांवर अधिक प्रभावीपणे मात करण्यासाठी आणि वित्तपुरवठा करण्यासाठी बहुस्तरीय विकास बँकांमध्ये समन्वय साधण्यासाठी यंत्रणा विकसित करणे.
तज्ञ गटाची रचना खालीलप्रमाणे आहे:
सह- संयोजक:
- प्रोफेसर. लॉरेन्स समर्स: अध्यक्ष एमेरिटस, हार्वर्ड विद्यापीठ
- एन. के सिंह : अध्यक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ आणि माजी अध्यक्ष, भारताचा पंधरावा वित्त आयोग.
सदस्य :
- थर्मन षण्मुगरत्नम: वरिष्ठ मंत्री, सिंगापूर सरकार;
- मारिया रामोस: अध्यक्ष ,अँग्लोगोल्ड अशांती आणि दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय कोषागाराच्या माजी महासंचालक
- आर्मिनियो फ्रागा: संस्थापक, को -सीआयओ हेज फंड आणि प्रायव्हेट इक्विटी, गवेआ इन्व्हेस्टमेंटोस आणि माजी गव्हर्नर, सेंट्रल बँक ऑफ ब्राझील
- प्राध्यापक निकोलस स्टर्न: प्रोफेसर, आयजी पटेल चेअर ऑफ इकॉनॉमिक्स अँड गव्हर्नमेट आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
- जस्टिन यिफू लिन: पेकिंग विद्यापीठातील नॅशनल स्कूल ऑफ डेव्हलपमेंटचे प्राध्यापक आणि मानद अधिष्ठाता आणि जागतिक बँकेचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रमुख अर्थतज्ज्ञ
- रेचेल काईट : टफ्ट्स विद्यापीठातील फ्लेचर स्कूल ऑफ इंटरनॅशनल अफेयर्सच्या अधिष्ठाता आणि जागतिक बँकेच्या माजी उपाध्यक्ष;
- वेरा सॉन्गवे: ब्रुकिंग्स संस्थेतील आफ्रिका ग्रोथ इनिशिएटिव्हमधील अनिवासी वरिष्ठ सन्माननीय सदस्य आणि आफ्रिका आर्थिक आयोगाच्या माजी कार्यकारी सचिव
हा तज्ञ गट 30 जून 2023 पूर्वी जी 20 भारताच्या अध्यक्षतेला आपला अहवाल सादर करेल.
Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1911433)
Visitor Counter : 361