पंतप्रधान कार्यालय
झाशी येथील जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकामुळे परिसरात पर्यटन आणि व्यापार वाढीला अधिक चालना मिळेल- पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
26 MAR 2023 10:54AM by PIB Mumbai
झाशी येथील जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक झाले आहे, त्यामुळे झाशी आणि आसपासच्या भागात पर्यटन आणि व्यापार वाढीला अधिक चालना मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशभर आधुनिक रेल्वे स्थानकं निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा हा एक अविभाज्य भाग असल्याचंही श्री मोदी म्हणाले.
बुंदेलखंडमधील लोकांसाठी झाशीला जागतिक दर्जाचे रेल्वे स्थानक बनवायला मंजुरी दिल्याबद्दल झाशीचे खासदार श्री अनुराग शर्मा यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचेही आभार मानले आहेत.
अनुराग शर्मा यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी केलेलं ट्विट;
"भारतभर आधुनिक रेल्वे स्थानकं उभारण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे झाशी आणि परिसरात पर्यटन आणि व्यापार वाढीला गती मिळेल."
***
S.Thakur/S.Mohite/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1910871)
आगंतुक पटल : 242
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam