आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली क्षयरोग रोखण्यासाठी संबंधित संस्थांची छत्तिसावी बैठक
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्षयरोगाचा अंत करण्यासाठी असलेली अतूट बांधिलकी आपण पाहिली आहे. क्षयरोगाविरुद्धच्या संयुक्त लढ्यात आम्ही आघाडीचे नेतृत्व करण्यास आणि जागतिक स्तरावर दक्षिण विभागाचा आवाज बनण्यास तयार आहोत: डॉ मनसुख मांडविया
"रुग्ण शोधणे, गणितीय प्रारुप तयार करणे, डिजिटल हाताळणी आणि सर्वेक्षण करणे यासाठी तळागाळापर्यंत पोहोचत भारत उल्लेखनीय कार्य करत आहे"
आरोग्यसेवा लोकांच्या जवळ नेण्यासाठी भारताने आचरणात आणलेल्या नवसंकल्पना, सिध्दांत आणि धोरण यांचे अनुकरण जगाने केले पाहिजे: डॉ लुसिका डिटियू
Posted On:
25 MAR 2023 2:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 मार्च 2023
“आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भारतातील क्षयरोगाचा अंत करण्यासाठी असलेली अतूट बांधिलकी पाहिली आहे.क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात आघाडीचे नेतृत्व करण्यास आणि जागतिक स्तरावर दक्षिण विभागाचा आवाज बनण्यास आम्ही तयार आहोत,"असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडविया,यांनी आज दिल्ली येथे क्षयरोग रोखा,या क्षयरोगाशी संबंधित असलेल्या संस्थांच्या 36 व्या बैठकीला संबोधित करताना केले. या बैठकीला त्यांच्यासोबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार या देखील उपस्थित होत्या.
बैठकीला संबोधित करताना, डॉ मांडविया म्हणाले की, “भारताने जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळाअंतर्गत 3 महत्त्वाचे आरोग्य प्राधान्यक्रम ओळखले आहेत. हे सार्वत्रिक आरोग्यक्षेत्रांशी निगडीत आहेत आणि आमच्या क्षयरोग निर्मूलनाच्या प्रतिबध्दतेशी संबंधित आहेत.
"रूग्ण शोधून काढणे, गणितीय प्रारुप तयार करणे, डिजिटल हाताळणी आणि सर्वेक्षण करणे यासाठी तळागाळापर्यंत पोहोचून नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे अतिशय मोलाचे(अपवादात्मक) कार्य केले जात आहे". "अशा चांगल्या पद्धतींची पुनरावृत्ती करण्यासाठी इतर देशांसोबत तांत्रिक सहाय्य सामायिक करण्यास भारत तयार आहे असे ते म्हणाले.
'केवळ कोविडपासून मुक्तता मिळवून परत फिरून येण्याचा हा प्रयत्न नाही तर 'प्रधानमन्त्री टीबी मुक्त भारत अभियान' यासारखी अद्ययावत रणनीती देखील यात आणली जात आहे; जी एक प्रकारची महत्वाची जागातिक चळवळ बनली आहे,' यावर डॉ मांडविया यांनी भर दिला.ते पुढे म्हणाले, की क्षयरोगाचा अंत करण्यासाठी विविध समुदायांना एकत्रित करणे अत्यंत गरजेचे आहे.
या रोगाविरुद्धच्या जागतिक लढ्यात टीबी लसीचे विशेष महत्त्व अधोरेखित करून, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी 'स्टॉप टीबी भागीदारी' यासाठी विचारमंथन करून, हा मुद्दा या वर्षीच्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेजवरील संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित संस्थांना केले. "टीबी लसीची गरज तातडीची आहे",असे त्यांनी ठळकपणे नमूद केले.'त्या लसीच्या विकासाचा मागोवा घेणे, उत्पादन क्षमता वाढवणे आणि देशांना त्याच्या सुलभ प्रवेशासाठी मदत करणे देखील महत्त्वाचे आहे,'याकडे डॉ मांडविया यांनी लक्ष वेधले.
"टीबी दूर करण्यात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे कारण भारताची यांतील प्रगती जगाला प्रोत्साहीत करेल,"असे प्रतिपादन डॉ लुसिका डिट्यु यांनी केले "नि:क्षय डेटासह भारताने तयार केलेल्या अतिशय अत्याधुनिक प्रारुपांची त्यांनी प्रशंसा केली. "आरोग्यसेवा लोकांच्या जवळ आणण्यासाठी भारताने आचरणात आणलेल्या नवसंकल्पना, सिध्दांत आणि धोरणे ही अशी गोष्ट आहे ज्याचे संपूर्ण जग अनुकरण करू शकते", असे सांगत त्यांनी भारतातील उपक्रमांची प्रशंसा केली.
स्टॉप टीबी भागीदारी मंडळाने देशांतर्गत पुराव्यासह विकसित केलेल्या टीबीच्या रुग्णभाराच्या भारताच्या अंदाजाचीही त्यांनी प्रशंसा केली. "टीबी प्रभावित समुदाय आणि नागरी समाज यासंदर्भातील अहवाल: अनुचित (प्राणघातक) विभाजन बंद करण्यासाठी प्राधान्य"यांचे देखील उदघाटन यावेळी करण्यात आले.
आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव श्रीम.रोली सिंग, दक्षिण-पूर्व आशियाई क्षेत्रासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रादेशिक संचालक डॉ पूनम खेत्रपाल सिंग,स्टॉप टीबी भागीदारी उपक्रमांचे उपाध्यक्ष श्री ऑस्टिन अरिन्झे ओबीफुना,आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ अशोक बाबू, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या क्षयरोग निर्मूलन विभागाचे उपमहासंचालक डॉ राजेंद्र जोशी,केंद्रीय क्षयरोग निर्मूलन विभागाचे विभागातील सहाय्यक महासंचालक, डॉ राव, तसेच मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
M.Iyengar/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1910690)
Visitor Counter : 187