मंत्रिमंडळ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाईपोटी मदतीचा अतिरीक्त हफ्ता देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी. / 01.01.2023 पासून हा हफ्ता लागू होणार
Posted On:
24 MAR 2023 10:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2023
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाईपोटी मदतीचा अतिरीक्त हफ्ता देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. दिनांक 01.01.2023 पासून हा हफ्ता लागू असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. या अतिरीक्त भत्त्यात महागाईविषयक भरपाई म्हणून, मूळ वेतन /निवृत्तीवेतनाच्या विद्यमान 38% या दरात 4% टक्के इतकी वाढ केली आहे.
महागाई भत्ता आणि महागाईपोटीचे सहकार्य म्हणून दिल्या जाणाऱ्या या सवलतीसाठी केंद्र सरकारच्या तिजोरीतून एकत्रितपणे दरवर्षी 12,815.60 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
केंद्र सरकारचे सुमारे 47.58 लाख कर्मचारी आणि 69.76 लाख निवृत्तीवेतनधारकांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळेल.
सातव्या केंद्रीय वेतन आयोगाने केलेल्या शिफारशींवर आधारीत, मान्यताप्राप्त सूत्रानुसारच ही वाढ केली असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
Jaydevi PS/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1910558)
Visitor Counter : 972
Read this release in:
Telugu
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam