गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलचे 24-26 मार्च 2023 या दरम्यान दिल्लीत आयोजन

Posted On: 23 MAR 2023 3:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23  मार्च 2023

अर्बन 20 कार्यक्रम अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स, CITIIS कार्यक्रमाच्या माध्यमातून  पहिल्या अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलचे  आयोजन करत आहे.  गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी (AFD) आणि युरोपियन महासंघ यांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शहरांमधील जीवनावर पडणाऱ्या हवामान बदलाच्या प्रभावाविषयी व्यापक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत शहरी विकासावरील संवादात जनतेला सहभागी करून घेण्यासाठी 9 देशांमधील निवडक 11 चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित केले जातील.

महोत्सवाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत-

  • शहरी वस्त्यांवर हवामान बदलाच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक परिणामांबाबत  प्रेक्षकांचे प्रबोधन करण्यासाठी चित्रपटाच्या शक्तिशाली माध्यमाचा उपयोग करणे
  • हवामानाला अनुकूल शहरे निर्माण  करण्याबद्दल संवाद  सुरू करणे  आणि लोकांकडून सूचना मागवणे

जगभरातील शहरांमधील जीवनावर बदलत्या वातावरणाचा  कसा परिणाम होत आहे हे प्रतिबिंबित करणारे चित्रपट सादर करण्यासाठी जगभरातील चित्रपट निर्मात्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 20 हून अधिक देशांमधून 150 प्रवेशिका प्राप्त झाल्या. नियुक्त  ज्युरीद्वारे प्रवेशिकांचे मूल्यांकन  करण्यात आले, त्यांनी  12 देशांमधील 27 चित्रपट या महोत्सवासाठी  निवडले.

निवडण्यात आलेले चित्रपट येत्या काही महिन्यांत नवी दिल्लीसह मुंबई, बंगळुरु , कोलकाता आणि अहमदाबाद येथील महोत्सवात दाखवले जातील.

यापैकी नवी दिल्ली येथील अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिव्हलचे उद्‌घाटन शुक्रवार, 24 मार्च 2023 रोजी एम.एल. भरतिया ऑडिटोरियम, अलायन्स फ्रॅन्सेस, लोधी इस्टेट, नवी दिल्ली इथे केले जाणार आहे.

उद्घाटन सत्राच्या अध्यक्षपदी जी 20 शेर्पा अमिताभ कांत असतील. या महोत्सवाचे वेळापत्रक येथे पाहता येईल : tinyurl.com/2jc873d2.

अर्बन क्लायमेट चित्रपट महोत्सवामध्ये सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स विषयी : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स ही गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली केंद्रीय स्वायत्त संस्था आहे.

CITIIS कार्यक्रमाबद्दल: CITIIS (सिटी इन्वेस्ट्मेन्ट्स टू इनोव्हेट, इंटिग्रेट अँड सस्टेन) हा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सी, युरोपियन महासंघ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स यांचा संयुक्त कार्यक्रम आहे.

 

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1909914) Visitor Counter : 162