पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय

मानव-वन्यप्राणी यामधील संघर्ष कमी करुन त्यांच्यातील सुसंवादी सहअस्तित्वाला चालना देण्याच्या दृष्टीने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी 14 मार्गदर्शक तत्वे केली जारी

Posted On: 21 MAR 2023 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 मार्च 2023

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्री भुपेंद्र यादव यांनी आज मानव-वन्यजीव यामधील संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने 14 मार्गदर्शक तत्वे जारी केली. भारतात मानव-वन्यजीव यामधील संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने करण्याच्या परिणामकारक आणि सक्षम उपाय कोणते याबाबत  सर्व संबधितांमध्ये सर्वसाधारण धारणा रुजावी  हा यामागील हेतू. ही मार्गदर्शक तत्वे सल्लास्वरुपातील आहेत आणि स्थळानुसार उद्भवणारे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने उपाय  विकसित करायला वाव असणारी अशी आहेत. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी भारत-जर्मन सहकार्य प्रकल्पांतर्गत ही मार्गदर्शक तत्वे विकसित केली आहेत. आणि ती पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयाने जर्मनीतील आंतरराष्ट्रीय मदत संस्था (Deutsche Gesellschaft fur Internationale Zusannenarbeit (GIZ) GmbH) तसेच कर्नाटक, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे  वनविभाग यांनी एकत्रितपणे तयार केली आहेत.  

जारी केलेली ही 14 मार्गदर्शक तत्वांबदद्ल पुढीलप्रमाणे

10 प्रजातीविशेष मार्गदर्शक तत्वे

  • मानव-हत्ती , -गवे, -चित्ता, -साप, - मगर, -गेंडा, -मकैक (लालतोंडी माकड), -रानडुक्कर,  अस्वल, - नीलगाय, - काळवीट आणि

4 सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे

  • भारतातील वने आणि प्रसारमाध्यम क्षेत्र : मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने परिणामकारक संवाद
  • व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा या संदर्भात मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वे
  • मानव-वन्यजीव संघर्षाशी संबधित परिस्थितीत जमावाचे प्रभावी नियंत्रण
  • मानव-वन्यजीव संघर्ष उद्भवल्यास जीवाला धोका पोचवणारी आरोग्यविषयक आणिबाणीची परिस्थिती : यावेळी जीव महत्वाचा ही भूमिका

मानव-वन्यजीव संघर्षाच्या नकारात्मक परिणामांपासून माणसे आणि वन्यजीव या दोघांनाही संरक्षण मिळावे म्हणून त्यांच्या सुसंवादी सहअस्तित्वाच्या आवश्यकतेतून ही तत्वे तयार केली आहेत.

ती तयार करताना विविध संस्थांनी आणि राज्य सरकारांच्या वनविभागांनी केलेल्या सूचनाही विचारात घेतल्या आहेत.

समग्र दृष्टीकोन तयार करण्याच्या दृष्टीने ही मार्गदर्शक तत्वे एक आराखडा देतात.मानव-वन्यजीव संघर्षाच्या परिस्थिती तात्काळ हाताळण्याच्या दृष्टीने तसेच त्यावेळी अशा संघर्षाकडे नेणाऱ्या कृती, असा संघर्ष टाळण्याच्या पद्धती, त्यांचे व्यवस्थापन या सगळ्याच बाजूने हा संघर्ष टाळण्याच्या हेतूने ही तत्वे साकारली आहेत.

ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करताना कृषी, पशुवैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा प्रशासन, ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था, स्वयंसेवी संस्था आणि प्रसारमाध्यमांसह प्रमुख संबंधितांचा आणि संबधित जागांचा समावेश असलेल्या सहभागी, समावेशक आणि एकात्मिक दृष्टिकोनाचा वापर करण्यात आला आहे.

R.Aghor/V.Sahrajrao/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai
 

 



(Release ID: 1909190) Visitor Counter : 465