ग्रामीण विकास मंत्रालय
भूमी संवाद IV: भू-आधार विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
Posted On:
15 MAR 2023 7:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2023
भू-आधार (ULPIN) म्हणजे युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN) याच्या मदतीने जमिनीचा-संदर्भ शोधणे यावरील एक राष्ट्रीय परिषद 17 मार्च, 2023 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित केलली आहे. भूमिसंवाद IV: डिजिटायझिंग आणि भू-आधार भू-आधार विभागातर्फे ही परिषद होणार आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह या परिषदेचे प्रमुख पाहुणे असतील.केंद्रीय ग्रामीण विकास आणि पोलाद राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते,केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न,सार्वजनिक वितरण आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती,केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील, देखील उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत तीन सत्रांचे आयोजन केले आहे.
- जमीन अभिलेखापरीक्षणाच्या लोकशाहीकरणाची माहिती आणि मातृभूमी;
- व्यवसाय सुलभतेसाठी (EoDB) भू-आधार अर्ज आणि राहणीमान सुलभता;
- सर्वोत्कृष्ट पद्धती – राष्ट्रीय आणि जागतिक (सर्वेक्षणासाठी भू-संदर्भ,पुनर्वेक्षण आणि वापर) यासाठी भू-आधार कार्ड आणि वे फॉरवर्डचा वापर.
या परिषदेत विविध केंद्र तसेच विविध राज्य/ केंद्रशासित प्रदेशांतील सरकार, शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्था, विभागीय संस्था, उद्योग समुदाय, नागरी सोसायट्या आणि जमीन प्रशासकीय केंद्राचे प्रतिनिधी आणि इतर हितसंबंधित सहभागी होणार आहेत.
* * *
S.Bedekar/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1907293)