माहिती आणि प्रसारण मंत्रालय
रेडिओ विश्वातील क्रांती ठरलेला मन की बात कार्यक्रम एप्रिल 2023 मध्ये 100 भाग पूर्ण करणार
आकाशवाणी 15 मार्चपासून दररोज ‘पंतप्रधानांची मन की बात’ मधील 100 विचारांची झलक सादर करणार
Posted On:
14 MAR 2023 7:36PM by PIB Mumbai
आकाशवाणीवरील, ‘पंतप्रधानांची मन की बात’ या सर्वात लोकप्रिय कार्यक्रमाचा शंभरावा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. 3 ऑक्टोबर 2014 रोजी विजयादशमीच्या मंगल दिनी सुरू झालेल्या या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे, आतापर्यंत 98 भाग प्रसारित झाले आहेत.
कार्यक्रमाचा शंभरावा भाग प्रसारित होईपर्यंत, 15 मार्च पासून रोज ऑल इंडिया रेडिओ मन की बात कार्यक्रमामुळे भारतात कसे परिवर्तन घडून आले, हे सांगणारी एक विशेष कार्यक्रम मालिका प्रसारित करणार आहे.
पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमातून आतापर्यंत प्रकाशात आणलेल्या शंभर संकल्पना या कार्यक्रम मालिकेतून श्रोत्यांसमोर उलगडल्या जातील. 'मन की बात' कार्यक्रमाच्या प्रत्येक भागातील पंतप्रधानांचे संबंधित साउंड बाइट्स आकाशवाणीवरील सर्व बातमीपत्रे आणि इतर कार्यक्रमांमध्ये प्रसारित केले जातील. 15 मार्च पासून ही मालिका सुरु होईल, आणि मन की बात कार्यक्रमाचा शंभरावा विशेष भाग प्रसारित होण्या पूर्वी, 29 एप्रिल रोजी ती पूर्ण होईल.
ही विशेष मालिका आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून प्रसारित केली जाईल. यामध्ये 42 विविध भारती केंद्रे, 25 एफएम रेनबो वाहिन्या, 4 एफएम गोल्ड वाहिन्या आणि देशातील 159 प्राथमिक वाहिन्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री मोदी यांचे साउंड बाईट्स आकाशवाणीच्या देशातील सर्व प्रादेशिक वाहिन्यांवरून प्रसारित होणार्या महत्वाच्या बातमीपत्रांमधून प्रसारित केले जातील. ‘न्यूज ऑन एआयआर’ अॅप आणि ऑल इंडिया रेडिओच्या यूट्यूब चॅनेलवरही नागरिकांना हा कार्यक्रम ऐकता येईल.
मन की बात कार्यक्रम:
रेडियोच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी नागरिकांशी साधलेला वैशिष्ट्यपूर्ण आणि थेट संवाद, म्हणजेच, ‘मन की बात’ या कार्यक्रमाने आतापर्यंत 98 भाग पूर्ण केले आहेत. हा कार्यक्रम, स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ, जलसंधारण, व्होकल फॉर लोकल’, यासारख्या सामाजिक बदलांचे उगम स्थान, माध्यम आणि प्रसारक ठरला आहे. खादी, भारतीय खेळणी उद्योग, आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्स, आयुष (AYUSH), अंतराळ यासारख्या क्षेत्रांवर या कार्यक्रमाचा लक्षणीय प्रभाव दिसून आला आहे. सादरीकरणाच्या नाविन्यपूर्ण आणि अनोख्या संवादात्मक शैलीमुळे, या कार्यक्रमाने संवादाचा एक अद्वितीय नमुना म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
*****
Jaidevi PS /R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1907048)