युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
शांघाय सहकार्य संघटनेच्या युवा परिषदेच्या 16 व्या बैठकीचे केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते नवी दिल्ली इथे उद्घाटन
Posted On:
14 MAR 2023 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मार्च 2023
भारताच्या अध्यक्षतेखाली शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) युवा परिषदेची 16 वी बैठक आज नवी दिल्ली इथे हायब्रीड (ऑनलाईन-ऑफलाईन) पद्धतीने पार पडली. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी एससीओ युवा परिषदेच्या बैठकीचे उद्घाटन केले. युवा व्यवहार विभागाच्या सचीव, मीता राजीवलोचन यांनी प्रमुख पाहुणे आणि एससीओ सदस्य देशांच्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले.
भारत सरकारच्या युवा व्यवहार विभागाचे सहसाचीव, नितेश कुमार मिश्रा, या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी होते. बैठकीदरम्यान, सहभागी देशांनी 2022-2023 मध्ये एससीओ युवा परिषदेच्या राष्ट्रीय कार्यक्रमा अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांबाबत माहितीचे आदान-प्रदान केले.
13 मार्च 2023 रोजी "प्रभावी समुदाय विकास उपक्रम" या संकल्पनेवर आभासी माध्यमातून आयोजित केलेल्या एससीओ युवा परिषदेचा अहवाल सर्व एससीओ सदस्य देशांच्या माहितीसाठी प्रसारित करण्यात आला.
एससीओ सदस्य देशांच्या युवा प्रतिनिधींचा मोठ्या प्रमाणातील सहभाग आणि परिषदे दरम्यान झालेल्या चर्चेत त्यांनी दाखवलेले स्वारस्य लक्षणीय होते. समाजाच्या उत्थानासाठी सामुदायिक विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी युवा प्रतिनिधींनी दाखविलेल्या आश्वासक उत्साहाचीही सहभागी देशांनी नोंद घेतली.
या काळात राष्ट्रीय कार्यक्रमा अंतर्गत भारताच्या एससीओ युवा परिषदेने केलेल्या कामाची सहभागी देशांनी प्रशंसा केली, आणि आणि नवी दिल्ली इथे एससीओ युवा परिषद आणि एससीओ युवा परिषदेचे आयोजन करताना प्रदर्शित केलेले आदरातिथ्य आणि उच्च स्तरीय संघटनात्मक कामाबद्दल भारता प्रति कृतज्ञता व्यक्त केली. 14 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली इथे रशियन आणि चिनी भाषांमधील आठ प्रतींवरील प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली.
एससीओ ही कायमस्वरूपी आंतर-सरकारी संस्था असून तिची स्थापना 2001 मध्ये झाली. भारत, कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, पाकिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे आठ देश एससीओ चे सदस्य आहेत. भारत 9 जून 2017 रोजी एससीओचा पूर्ण सदस्य झाला. अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया हे चार निरीक्षक देश आहेत. चीनी आणि रशियन या भाषा एससीओ च्या अधिकृत कामकाजाच्या भाषा आहेत.
Jaydevi PS/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1906980)
Visitor Counter : 181