राष्ट्रपती कार्यालय
केनियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींची घेतली भेट
Posted On:
10 MAR 2023 6:22PM by PIB Mumbai
केनियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश, न्यायमुर्ती मार्था के कुमे यांच्या नेतृत्वाखालील केनियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या शिष्टमंडळाने आज (March 10, 2023) रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.
केनिया बरोबर भारताचे अनेक शतकांपासुनचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असं राष्ट्रपती या शिष्टमंडळाचं स्वागत करताना म्हणाल्या. केनियाच्या विकासात भागिदार असल्याचा भारताला सार्थ अभिमान आहे.केनियामध्ये आलेल्या नवीन सरकारसोबत उच्चस्तरीय राजकीय संबंध वृद्धींगत करण्याची परंपरा कायम ठेवायला भारत उत्सुक आहे. द्विपक्षीय व्यापार संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र काम केले पाहिजे, असं राष्टपती म्हणाल्या.
न्यायमूर्ती कूमे केनियाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत. केनियामध्ये सर्वांसाठी न्याय सुलभ करण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.
***
N.Chitale/S.Mohite/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905683)
Visitor Counter : 196