वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत आणि अमेरिका व्यावसायिक संवादानंतर सेमीकंडक्टर पुरवठा साखळी आणि नाविन्यपूर्ण भागीदारी स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य करार 2023 वर स्वाक्षरी
सेमीकंडक्टर पुरवठा साखळीत लवचिकता आणि वैविध्यता आणण्यासाठी एक सहयोगी यंत्रणा स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार
Posted On:
10 MAR 2023 12:23PM by PIB Mumbai
भारत – अमेरिका व्यावसायिक संवाद आराखड्या अंतर्गत सेमीकंडक्टर पुरवठा साखळी आणि नावीन्यपूर्ण भागीदारी स्थापन करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर (एमओयू) आज नवी दिल्ली येथे झालेल्या "कमर्शियल डायलॉग 2023" नंतर दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली.
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जीना रायमोंडो या नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमधील नवीन व्यापार आणि गुंतवणुकीच्या संधी खुल्या करण्यासाठी आवश्यक सहकार्यावर चर्चा करण्यासाठी आज भारत-अमेरिका व्यावसायिक संवाद पुन्हा सुरू करण्यात आला.
या सामंजस्य करारात अमेरिकेच्या चिप्स अँड सायन्स ॲक्ट आणि भारताच्या सेमीकंडक्टर मिशनच्या दृष्टीकोनातून सेमीकंडक्टर पुरवठा साखळीत लवचिकता आणि वैविध्यता यावर दोन्ही सरकारांमध्ये एक सहयोगी यंत्रणा स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
दोन्ही देशांच्या पूरक सामर्थ्यांचा फायदा घेणे आणि सेमीकंडक्टर मूल्य साखळीच्या विविध पैलूंवर चर्चा करून व्यावसायिक संधी आणि सेमीकंडक्टर इनोव्हेशन इकोसिस्टमचा विकास करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. या सामंजस्य करारामध्ये परस्पर फायदेशीर असे संशोधन आणि विकास याबरोबरच उभय देशातील प्रतिभा आणि कौशल्य विकास यांचा समावेश आहे.
***
JPS/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905582)
Visitor Counter : 226