गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे पहिल्या महिला आयकॉन्स लीडिंग स्वच्छता (WINS) पुरस्कार 2023 ची घोषणा
Posted On:
09 MAR 2023 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2023
स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनात महिलांच्या प्रभावावर प्रकाश टाकण्यासाठी, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री, श्री हरदीप सिंग पुरी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला 7 मार्च 2023 रोजी 'वुमन आयकॉन लीडिंग स्वच्छता' (WINS- विन्स) पुरस्कार 2023 ची घोषणा केली. . महिलांच्या नेतृत्वाखालील संस्था आणि वैयक्तिक महिलांनी शहरी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनातील प्रेरणादायी आणि अनुकरणीय उपक्रमांना ओळखणे आणि प्रसारित करणे हे WINS पुरस्कार 2023 चं उद्दिष्ट आहे.
(i) स्वयं-सहायता गट (SHGs), सूक्ष्म उपक्रम, सामाजिक संस्था (NGO), स्टार्टअप्स आणि या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या वैयक्तिक महिला या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतील. या पुरस्कारामध्ये सहभाग घेण्यासाठी 8 मार्च ते 5 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येतील. (i) सामुदायिक/सार्वजनिक शौचालयांचे व्यवस्थापन (ii) सांडपाण्याच्या टाक्या साफ करणारी सेवा (iii) प्रक्रिया केलेलं सांडपाणी आणि त्याचा पुनर्वापर (iv) महानगरपालिका पाणी संकलन आणि वाहतूक व्यवस्थापन या विषयांशी निगडीत क्षेत्रांतर्गत अर्जांचा विचार केला जाईल. तसंच साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा, टाकाऊ पासून संपत्ती,घन कचरा व्यवस्थापन, IEC- प्रशिक्षण, क्षमता निर्माण, तंत्रज्ञान आणि हस्तक्षेप आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि महिलाही अर्ज करु शकतात.
अर्जाचा नमुना सर्व राज्यांना उपलब्ध करून दिला जाईल.
या संदर्भातली प्रक्रिया खालीलप्रमाणे असेल:
राज्ये आणि शहरे WINS –विन्स पुरस्कार 2023 चे तपशील त्यांच्या संकेत स्थळ, पोर्टल आणि समाज माध्यमांमार्फत प्रसिद्ध करतील. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सुचवलेला अर्जाचा नमुना सर्व राज्ये आणि शहरांना पाठवण्यात आला आहे.
(ULBs) अर्थात शहरी स्थानिक संस्था अर्जांचे मूल्यमापन करतील आणि स्वच्छतम पोर्टलद्वारे राज्यात 5 अर्जदारांना नामनिर्देशित करतील. राष्ट्रीय स्तरावर, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे पदाधिकारी अर्जांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि प्रत्येक श्रेणीतील विजेते निवडण्यासाठी समीक्षक नेमण्यात येतील.
* * *
S.Bedekar/S.Mohite/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1905434)
Visitor Counter : 217