पंचायती राज मंत्रालय
पंचायती राज मंत्रालय, 15 व्या वित्त आयोगा अंतर्गत पंचायती राज संस्थांच्या ऑनलाईन लेखापरिक्षण आणि निधी वितरण प्रक्रियेबाबत उद्या राज्यांबरोबर विचारविनिमय बैठक घेणार
Posted On:
09 MAR 2023 2:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2023
15 व्या वित्त आयोगाअंतर्गत पंचायती राज संस्थांसाठी ऑनलाईन लेखापरिक्षण आणि निधी वितरण प्रक्रियेबाबत पंचायती राज मंत्रालय उद्या नवी दिल्ली येथे उद्या राज्यांबरोबर विचारविनिमय बैठक घेणार आहे. पंचायती राज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. अतिरिक्त सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार आणि पंचायती राज मंत्रालयाचे सहसचिव आलोक प्रेम नागरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. स्थानिक निधी आणि लेखापरीक्षण संचालनालयाच्या प्रतिनिधींसह राज्यांच्या पंचायती राज विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत.
पंचायती राज मंत्रालय वित्त मंत्रालयाच्या (एमओएफ) कार्यकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार पंधराव्या वित्त आयोगाचे (XV FC) अनुदान राज्यांना जारी करते. ज्या राज्यांनी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपली तात्पुरती किंवा लेखापरीक्षित खाती ऑनलाईन स्वरूपात सार्वजनिक असतील त्यांनाच आर्थिक वर्ष 2021-22 पासून अनुदान मिळेल असे पंधराव्या वित्त आयोगाने (XV FC) नमूद केले आहे.
पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार, पूर्ण अनुदानासाठी पात्र होण्याकरता 2021-22 आणि 2022-23 साठी किमान 25% स्थानिक स्वराज्य संस्थाकडे मागील वर्षासाठी तात्पुरती खाती असायला हवीत तसेच, गेल्या वर्षाच्या आधीच्या वर्षासाठी लेखापरीक्षण झालेली खाती ऑनलाईन सार्वजनिकरित्या उपलब्ध असावीत हे राज्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे. मागील वर्षासाठी तात्पुरती खाती तसेच, गेल्या वर्षाच्या आधीच्या वर्षासाठी लेखापरीक्षण झालेलीजी खाती ऑनलाइन सार्वजनिकरित्या उपलब्ध असतील केवळ त्याच स्थानिक स्वराज्य संस्थासाठी राज्यांना 2023-24 नंतर एकूण अनुदान प्राप्त होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांना 2024-25 पासून अनुदान जारी करण्यासाठी राज्य वित्त आयोगाची (एसएफसी) स्थापना करणे आवश्यक आहे असेही पंधराव्या वित्त आयोगाने नमूद केले आहे.
या दोन महत्त्वाच्या शिफारशींमुळे उद्भवणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि यासंदर्भात राज्यांची रणनीती तसेच तयारी तपासण्यासाठी पंचायती राज मंत्रालयाने ही एक दिवसीय विचारविनिमय बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत राज्ये वरील शिफारशींच्या संदर्भात त्यांचे धोरणे आणि तयारी यांची देवाणघेवाण करतील.
* * *
JPS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1905285)