संरक्षण मंत्रालय

भारतीय नौदलाचा सर्वात मोठा युद्धाभ्यास, थिएटर लेव्हल ऑपरेशनल रेडिनेस एक्सरसाइज (ट्रोपेक्स-23)

Posted On: 09 MAR 2023 9:25AM by PIB Mumbai

भारतीय नौदलाचा 2023 साठीचा प्रमुख कार्यान्वयन स्तरावरील युद्धाभ्यास ट्रॉपेक्सची या आठवड्यात अरबी समुद्रात सांगता झाली. हिंद महासागराच्या सागरी हद्दीत (आयओआर) 22 नोव्हेंबर ते 23 मार्च या चार महिन्यांच्या कालावधीत याचे आयोजन करण्यात आले होते.

एकूण सरावात तटीय संरक्षण सराव सी व्हिजिल आणि सागरी तसेच जमीनीवरील सराव अँफेक्स (AMPHEX) यांचा समावेश होता. भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि तटरक्षक दलाचाही यात एकत्रितपणे लक्षणीय सहभाग होता.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरासह हिंद महासागराच्या सागरी हद्दीत हा सराव झाला. याची हद्द पश्चिमेकडील पर्शियन आखातापासून पूर्वेकडील उत्तर ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यापर्यंत 21 दशलक्ष चौरस नॉटिकल मैल पेक्षा जास्त होतीट्रोपेक्स 23 मध्ये भारतीय नौदलाची सुमारे 70 जहाजे, सहा पाणबुड्या आणि 75 हून अधिक विमानांचा सहभाग होता.

ट्रोपेक्स 23 या नोव्हेंबर 2022 मध्ये सुरु झालेल्या भारतीय नौदलासाठीच्या अतिशय तीव्र, खडतर कार्यान्वयनाच्या टप्प्याची सांगता झाली. संरक्षण मंत्र्यांनी अंतिम संयुक्त टप्प्याचा एक भाग म्हणून 06 मार्च 23 रोजी नव्याने दाखल स्वदेशी विमानवाहू युद्धनौका विक्रांतला एक दिवसीय भेट दिली आणि भारतीय नौदलाच्या कार्यान्वयन सज्जता आणि सामग्री तयारीचा आढावा त्यांनी आढावा घेतला. यावेळी   नौदलाने स्वदेशी एलसीएच्या डेक कार्यान्वयन आणि थेट तोफमाऱ्यासह लढाऊ कार्यान्वयनात्या विविध पैलूंचे प्रात्यक्षिक सादर केले.


***

JaideviPS/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1905234) Visitor Counter : 189


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu