अर्थ मंत्रालय
'विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी वित्तीय सेवांची कार्यक्षमता वाढवणे' या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमध्ये उद्या पंतप्रधान करणार मार्गदर्शन
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 10.00 वाजता "विकासाच्या संधी निर्माण करण्यासाठी वित्तीय सेवांची कार्यक्षमता वाढवणे" या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारला व्हिडिओ संदेशाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.
Posted On:
06 MAR 2023 7:08PM by PIB Mumbai
अर्थसंकल्प पश्चात वेबिनार हा सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्प पश्चात वेबिनारच्या मालिकेचा हा एक भाग आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना प्राप्त करण्याच्या दृष्टीने ही मालिका आयोजित केली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पात सात प्राधान्यक्रम अवलंबण्यात आले असून ते परस्परांना पूरक आहेत. आणि ‘अमृत काळात 'सप्तर्षी’ म्हणून आपल्याला मार्गदर्शक आहेत. आर्थिक क्षेत्र हे सरकारच्या सात प्राधान्यांपैकी एक आहे.
वेबिनारमध्ये खालील विषयांअंतर्गत सहा विविध सत्रे असतील:
1. गिफ्ट ( जीआयएफटी ) आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रामध्ये विकासाच्या संधी निर्माण करणे
2. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ( एमएसएमई) विनाअडथळा पतपुरवठा पतहमी सुविधा उपलब्ध करून देणे
3. खाते उघडणे आणि डिजिटल पेमेंटसाठी ग्राहक सुलभता वाढवणे
4. केंद्रीय डेटा प्रक्रिया केंद्राद्वारे व्यवसाय सुलभीकरण तसेच समभाग आणि लाभांशासाठी पुन्हा दावा करणे
5. अमृत काळाच्या गरजांनुसार नियमांना अनुकूल बनवणे
6. एनएफआयआर आणि रोखे बाजारामधील क्षमता वृद्धीसह वित्तीय क्षेत्राची कार्यक्षमता वाढवणे
संबंधित केंद्र सरकारच्या मंत्रालयांचे मंत्री आणि सचिवांव्यतिरिक्त, नियामक, बाजारातील सहभागी आणि उद्योग प्रतिनिधींसह वित्तीय क्षेत्रातील अनेक हितसंबंधीत या वेबिनारला उपस्थित राहतील आणि अर्थसंकल्पीय घोषणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सूचनांद्वारे योगदान देतील.
***
Nilima C/Sonal C /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1904736)