पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून सीमा भागातल्या गावांचा व्यापक विकास करणार - केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

Posted On: 05 MAR 2023 4:45PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून सीमा भागातल्या गावांचा व्यापक विकास करणार असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं आहे. सीमा भागातील बलशाली गावे म्हणजे बलशाली राष्ट्राकडे वाटचाल असल्याचं ते म्हणाले. व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून 1 हजार 400 सीमावर्ती गावे निवडण्यात आली असून केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी भेटी देणार आहेत. या सीमावर्ती गावांमध्ये एक रात्र वास्तव्य करून तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी पावले उचलणार आहेत.

व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री तीन आणि चार मार्च 2023 रोजी लडाखच्या दोन दिवसीय भेटीवर होते. यावेळी त्यांनी इतर गावांसह त्सागा पाश्चर, रेझान्ग-ला आणि चुशुल या गावांना भेटी दिल्या.

केंद्र सरकार अंमलबजावणी करत असलेल्या विविध योजना अधोरेखित करताना यादव यांनी सांगितलं की जनधन योजना, कोविड लसीकरण, आयुष्मान योजना कार्ड आणि गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत शिधावाटप या उपक्रमांचा कठीण काळात लोकांना खूप मोठा फायदा झाला.

भारत-चीन सीमा भागाजवळच्या चुशुल या गावात केंद्रीय मंत्र्यांनी गावातल्या लोकांशी संवाद साधला आणि सीमावर्ती गावांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. याच संदर्भात यादव यांनी सांगितलं की व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून सीमावर्ती गावं आणि नवी दिल्ली यांच्यातलं अंतर कमी करण्यात येणार आहे. संपर्क,शिक्षित  सुशिक्षित आणि विकसित लडाख यामुळे साध्य करता येईल असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय मंत्र्यांनी चुशुल गावात रात्री एका स्थानिक नागरिकाच्या घरी वास्तव्य केलं.

***

N.Chitale/S.Naik/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1904438) Visitor Counter : 181