श्रम आणि रोजगार मंत्रालय
03 मे 2023 पर्यंत ऑनलाइन सादर करता येणार्या संयुक्त पर्यायाची प्रक्रिया प्रसिद्ध करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी संघटना सर्वतोपरी प्रयत्न
आजपर्यंत 8,000 हून अधिक सदस्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले
संघटनेचे 20 फेब्रुवारी 2023 च्या परिपत्रक योजनेच्या तरतुदींचे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचेही पालन
Posted On:
04 MAR 2023 8:20PM by PIB Mumbai
EPS-95 मध्ये उच्च पगारावर योगदान देण्यासाठी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन संयुक्त (कर्मचारी आणि नियोक्ता) पर्याय अर्ज नमूना युनिफाइड पोर्टलवर सादर केला आहे. हा अर्ज मूळ योजनेच्या तरतुदींचे पालन करत 04.11.2022 रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा करतो. अर्ज नमूना भरून दाखल करण्याची अंतिम तारीख 03 मे 2023 असली तरीही आजपर्यंत 8,000 हून अधिक सदस्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.
उच्च वेतनावर कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांचे योगदान गुंतलेले असल्याने, भविष्य निर्वाह निधी आणि ईपीएस-95 योजना जेव्हा जास्त पगारावर योगदान देतात तेव्हा त्यांना संयुक्त विनंतीची आवश्यकता असते. ही नवी आवश्यकता गरजेची नाही तसेच ईपीएस अंतर्गत उच्च पगारावर संयुक्त पर्यायाचा वापर करता येणे एक आवश्यक पूर्वचिन्ह आहे याची आर. सी. गुप्ता प्रकरणातील निकालातून सर्वोच्च न्यायालयाने याची पुष्टी केली आहे
संघटनेचे 20 फेब्रुवारी 2023 चे परिपत्रक योजनेच्या तरतुदींचे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करते. भविष्य निर्वाह निधीचे फायदे आणि मूल्यमापन यांची अचूक गणना करण्यासाठी योगदानाचे योग्य मूल्यांकन आणि त्यांची ठेव निधीत वळवणे, मागील सेवा आणि पैसे पाठवणे आवश्यक आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनेने सेवानिवृत्त ईपीएस सदस्यांसाठी (01.09.2014 पूर्वी आणि ज्यांच्या पर्यायांचा आधी विचार केला गेला नव्हता) 4 मार्च 2023 रोजी पर्याय बंद केले आहेत. 4 मार्च 2023 पर्यंत या श्रेणीतील कर्मचाऱ्यांकडून 91,258 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत.
भविष्य निर्वाह निधी संघटना 03 मे, 2023 पर्यंत ऑनलाइन सादर करता येणार्या संयुक्त पर्यायाची प्रक्रिया प्रसिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 01.09.2014 रोजी ईपीएफ सदस्य असलेल्या व्यक्तींच्या ऑनलाइन अर्जांना प्राधान्य दिले जात आहे. 27 फेब्रुवारी, 2023 पासूनच्या अर्जांना प्राधान्य दिले जात असून आतापर्यंत 8,897 सदस्यांनी त्यांच्या नियोक्त्यांकडे अर्ज सादर केले आहेत.
***
G.Chippalkatti/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1904254)
Visitor Counter : 331