ऊर्जा मंत्रालय

भारताने आयोजित केली बिम्स्टेक (BIMSTEC) ऊर्जा केंद्राच्या (BEC) नियामक मंडळाची पहिली बैठक

Posted On: 01 MAR 2023 3:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 मार्च 2023
 

1.भारताच्या "नेबरहुड फर्स्ट" आणि "ऍक्ट ईस्ट" धोरणांवर विशेष भर देण्यात आला आणि बिम्स्टेक (BIMSTEC) देश एकमेकांकडून शिकू शकतील अशा क्षेत्रांविषयी वृत्तांत  सादर करण्यात आला.  

2.बिम्स्टेक ऊर्जा केंद्राचे यजमान म्हणून, भारताने बिम्स्टेक ऊर्जा केंद्र (BEC) भारतात स्थापन करण्याबाबतचे सादरीकरण केले, आणि  केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेच्या (CPRI), बंगळूरू इथल्या आवारात, बिम्स्टेक ऊर्जा केंद्र (BEC) स्थापन केले जाईल अशी माहिती सदस्य देशांना दिली.

3. बैठकीत “भारत सरकार आणि बिम्स्टेक सचिवालय यांच्यातील यजमान देश करार’’ यावर विचार करण्यात आला आणि त्याला अंतिम रूप देण्यात आले, बिम्स्टेकच्या कायमस्वरूपी कार्यकारिणीच्या सातव्या बैठकीत विचार करण्यासाठी त्याची शिफारस करण्यात आली.

4. बिम्स्टेक (BIMSTEC) ऊर्जा केंद्राच्या नियमांक मंडळाची पहिली बैठक आयोजित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांची सदस्य देशांनी प्रशंसा केली आणि बिम्स्टेक च्या अशा बैठका वारंवार होऊ शकतात, असे मतही व्यक्त केले.

भारताने  27 फेब्रुवारी 2023 रोजी बंगलुरू  येथील शांगी-ला हॉटेलमध्ये बिम्स्टेक (BIMSTEC) ऊर्जा केंद्राच्या (BEC) नियामक मंडळाची पहिली बैठक आयोजित केली होती. ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव आणि BEC च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष, अजय तिवारी, यांनी बिम्स्टेक सदस्य देशांच्या प्रतिनिधींचे स्वागत केले आणि बिम्स्टेक देशांमध्ये सुरु असलेल्या  सहकार्याची थोडक्यात पार्श्वभूमी सांगितली.

बिम्स्टेक गटामधील बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड यासह, सर्व बिम्स्टेक देशांच्या  प्रतिनिधींचा या बैठकीत सक्रीय सहभाग होता. प्रदीर्घ काळानंतर  बैठकीत सहभागी होण्याची संधी मिळाल्या बद्दल सर्व सदस्य देशांनी समाधान व्यक्त केले.

बैठकीदरम्यान भारताच्या "नेबरहुड फर्स्ट" आणि  "ऍक्ट ईस्ट" धोरणांवर विशेष भर देण्यात आला. बिम्स्टेक देश एकमेकांकडून शिकू शकतील अशा क्षेत्रांवरील छायाचित्राव्दारे वृत्तांत  यावेळी सादर करण्यात आला.

बिम्स्टेक ऊर्जा केंद्राचे यजमान म्हणून, भारताने बिम्स्टेक ऊर्जा केंद्र (BEC) भारतात स्थापन करण्याबाबतचे सादरीकरण केले. केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेच्या (CPRI), बंगळूरू इथल्या आवारात, बिम्स्टेक ऊर्जा केंद्र (BEC) स्थापन केले जाईल अशी माहिती भारताने सदस्य देशांना दिली.

‘सीईए’चे अध्यक्ष घनश्याम प्रसाद यांचे बिम्स्टेक ऊर्जा केंद्राचे पहिले कार्यकारी संचालक म्हणून नामांकन करण्यात आले. या बैठकीत “भारत सरकार आणि बिम्स्टेक सचिवालय यांच्यातील यजमान देश करारावर” विचार करण्यात आला आणि त्याला अंतिम रूप देण्यात आले, आणि बिम्स्टेक च्या  कायमस्वरूपी कार्यकारिणीच्या सातव्या बैठकीत विचार करण्यासाठी  त्याची शिफारस करण्यात आली.

बिम्स्टेक प्रदेशातील सध्याची ऊर्जा परिस्थिती लक्षात घेता, बैठकीने BEC च्या विशेष विभागांतर्गत (a) सायबर सुरक्षा, (b) ग्रीन (हरित) हायड्रोजन (c) ऊर्जा संक्रमण, या अतिरिक्त क्षेत्रांचा समावेश करण्याची शिफारस केली.

बिम्स्टेक (BIMSTEC) ऊर्जा केंद्राच्या नियमांक मंडळाची पहिली बैठक आयोजित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांची सदस्य देशांनी प्रशंसा केली. बिम्स्टेक च्या अशा बैठका वारंवार होऊ शकतात, असे मतही सर्व सदस्य  देशांनी व्यक्त केले.

 

S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1903355) Visitor Counter : 214