दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

भारताने पटकावला GSMA गव्हर्नमेंट लीडरशिप पुरस्कार 2023


भारतीय दूरसंचार क्षेत्र हे सनराईज क्षेत्र म्हणून पुढे येत असून, याची जगाने दखल घेतली आहे : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

Posted On: 28 FEB 2023 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला जागतिक मान्यता मिळाली आहे.  दूरसंचार धोरण आणि नियमनातील सर्वोत्तम पद्धती लागू केल्याबद्दल जीएसएम असोसिएशन (GSMA) ने  भारताला गव्हर्नमेंट लीडरशिप अवॉर्ड 2023 प्रदान केले आहे. 

 

भारताला हा पुरस्कार मिळाल्या बद्दल बोलताना, दूरसंचार,  इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि रेल्वे मंत्री, अश्विनी वैष्णव म्हणाले,  “GSMA पुरस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरसंचार क्षेत्रात  लागू केलेल्या सुधारणांना मिळालेली जागतिक मान्यता दर्शवत आहेत. आपण सर्वांनी या सुधारणांचे परिणाम बघितले आहेत. ज्या RoW परवानग्या मिळायला पूर्वी 230 दिवसांपेक्षा जास्त काळ लागत होता, त्या आता केवळ 8 दिवसांमध्ये मंजूर होत आहेत. 85% पेक्षा जास्त मोबाईल टॉवरना आता तत्काळ मंजुरी मिळत आहे.  भारतामधील 387 जिल्ह्यांमधील सुमारे 1 लाख ठिकाणचे  भारताचे सुरु झालेले  5G नेटवर्क   जगातील  वेगवान पैकी एक  आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्र हे सनराईज क्षेत्र म्हणून  पुढे येत असून, याची जगाने  दखल घेतली आहे.”

दूरसंचार परिसंस्थेतील 750 हून अधिक मोबाइल ऑपरेटर आणि 400 कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणारे GSMA,दरवर्षी एका देशाच्या कार्याची दखल घेते.  27 फेब्रुवारी 2023 रोजी बार्सिलोना इथल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस मध्ये, भारताला विजेता म्हणून घोषित करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये दूरसंचार क्षेत्रात संरचनात्मक आणि प्रक्रियात्मक सुधारणा आणल्या. त्यानंतर परवाना सुधारणा, पीएम गति शक्ती संचार पोर्टलची निर्मिती, राइट ऑफ वे (RoW) सुव्यवस्थित करणे, स्पेक्ट्रम सुधारणा, उपग्रह सुधारणा इ. सारखे अनेक उपक्रम राबवण्यात आले.  

भारताच्या धोरणांवरचा GSMA द्वारे प्रकाशित दृष्टीक्षेप येथे पाहता येईल.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1903165) Visitor Counter : 198