नौवहन मंत्रालय
जगात सर्वात लांबवरच्या नदी प्रवासाला निघालेली ‘एमव्ही गंगा विलास’ रिव्हर क्रुझ, 28 फेब्रुवारीला दिब्रुगड इथे आपला प्रवास पूर्ण करणार
Posted On:
25 FEB 2023 5:22PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारी रोजी वाराणसी इथे हिरवा झेंडा दाखवल्या नंतर, जगातल्या सर्वात लांबवरच्या नदी प्रवासाला निघालेली ‘एमव्ही गंगा विलास’ रिव्हर क्रुझ (नदी पर्यटन जहाज), 28 फेब्रुवारी रोजी दिब्रुगढ इथे आपला प्रवास पूर्ण करेल. त्याच दिवशी दिब्रुगढमध्ये भारत सरकारच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालया अंतर्गत भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणा (IWAI) द्वारे स्वागत समारंभ आयोजित केला जाईल. या कार्यक्रमाला केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री (MoPSW) सर्बानंद सोनोवाल यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, शिष्टमंडळाचे प्रतिनिधी आणि भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (IWAI) आणि केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित राहतील.
‘एमव्ही गंगा विलास' ने भारत आणि बांगलादेशला जगाच्या नदी पर्यटनाच्या नकाशावर आणले आहे, आणि त्यामुळे भारतीय उपखंडातील पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी एक नवे अवकाश खुले झाले आहे, असे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे.
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1902343)
Visitor Counter : 156