माहिती आणि प्रसारण मंत्रालय
31व्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळ्यात प्रकाशन विभाग आपली पुस्तके आणि जर्नल्स प्रदर्शित करणार
Posted On:
24 FEB 2023 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2023
भारत सरकारचे प्रमुख प्रकाशन गृहाचा प्रकाशन विभाग 31व्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळ्यात आपल्या पुस्तकांचा आणि जर्नल्सचा समृद्ध संग्रह प्रदर्शित करणार आहे. देशातील सर्वात प्रसिद्ध पुस्तक मेळ्यांपैकी एक मानला जाणारा नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 25 फेब्रुवारी ते 5 मार्च 2023 या कालावधीत प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. नॅशनल बुक ट्रस्ट ही भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत स्वायत्त संस्था इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने या मेळ्याचे आयोजन करत आहे.
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर प्रकाश टाकणाऱ्या आणि देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करणाऱ्या आपल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ पुस्तक संग्रहाचे प्रदर्शन प्रकाशन विभाग करणार आहे. पुस्तक प्रदर्शनात इतिहास, कला आणि संस्कृती, गांधीवादी साहित्य, प्रदेश आणि लोक, व्यक्तिमत्त्वे आणि चरित्रे, सिनेमा, बालसाहित्य आणि यासारख्या इतर अनेक विषयांवरील पुस्तके मांडली जाणार आहेत. याशिवाय, प्रकाशन विभाग आपली राष्ट्रपती भवनातील पुस्तकांची मालिका तसेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भाषणेही या मेळ्यात पुस्तक रूपात सादर करणार आहे. हे साहित्य केवळ प्रकाशन विभागाद्वारेच प्रकाशित केले जाते.
पुस्तकांसोबतच प्रकाशन विभागाची 'योजना, कुरुक्षेत्र आणि आजकल' ही आघाडीची नियतकालिके पुस्तकांच्या स्टॉलवर उपलब्ध असतील. मुलांचे लोकप्रिय मासिक बाल भारती देखील प्रदर्शनाचा भाग असेल. एम्प्लॉयमेंट न्यूज (रोजगार समाचार) हे प्रकाशन विभागातील सर्वाधिक मागणी असलेले रोजगार संबंधित साप्ताहिक वृत्तपत्र देखील उपलब्ध असेल.
प्रकाशन विभाग आपली पुस्तके आणि जर्नल्स - स्टॉल क्रमांक 171-186, हॉल क्रमांक 5, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे प्रदर्शित करेल.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1902086)
Visitor Counter : 289