युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग सिंग ठाकूर उद्या नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमवर 3 दिवसीय अखिल भारतीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेचे करणार उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
23 FEB 2023 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2023
कोरिया-भारत राजनैतिक संबंधांना यावर्षी 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारतातील कोरियन सांस्कृतिक केंद्राने भारताच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण तसेच कोरिया राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठच्या सहकार्याने अखिल भारतीय इंटर एसएआय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले आहे.
दोन्ही देशांमधील क्रीडा देवाणघेवाण कार्यक्रम म्हणून यंदाची अखिल भारतीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा 24 फेब्रुवारी (शुक्रवार) ते 26 फेब्रुवारी (रविवार) दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियमच्या खाशाबा जाधव इनडोअर कुस्ती हॉलमध्ये होणार आहे.
24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता होणार्या या उद्घाटन समारंभाला केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर, भारतातील कोरियन राजदूत चांग जे बोक, उपमंत्री तसेच कोरियन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सार्वजनिक मुत्सद्देगिरीचे राजदूत ली संग ह्वा आणि कोरिया राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाचे कुलपती आन योंग क्यु प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात दोन्ही देशांमधील क्रीडा क्षेत्रात देवाणघेवाण संदर्भात सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाईल तसेच कोरिया राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा चमू आणि कलापथक एक विशेष सादरीकरण, कोरियन नृत्य, तायक्वांदो प्रात्यक्षिक आणि के-पॉप कव्हर नृत्य सादर करेल.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1901706)
आगंतुक पटल : 237