कोळसा मंत्रालय

कोल इंडिया लिमिटेडकडून वापर नसलेल्या 30 खाण क्षेत्रांचे पर्यावरणस्नेही-पर्यटन स्थळांमध्ये रुपांतर


हरित पट्ट्याचा 1610 हेक्टर विस्तार

Posted On: 21 FEB 2023 4:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 फेब्रुवारी 2023

 

कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) आपल्या निष्क्रिय खाणींचे पर्यावरणस्नेही-उद्यानांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया राबवत आहे. ही स्थळे पर्यावरणस्नेही-पर्यटन स्थळे म्हणून लोकप्रिय होत आहेत.  ही पर्यावरणस्नेही-उद्याने आणि पर्यटन स्थळे स्थानिक लोकांसाठी उपजीविकेचे साधनही ठरत आहेत.  अशी तीस पर्यावरणस्नेही-उद्याने  मोठ्या संख्येने पर्यटक आकर्षित करू लागली आहेत. सीआयए खाण क्षेत्रांमध्ये आणखी पर्यावरणस्नेही-उद्याने आणि पर्यावरणस्नेही-पुनरुज्जीवन स्थळांच्या निर्मितीसाठी योजना सुरू आहेत.

गुंजनपार्क, ईसीएल, गोकुळ पर्यावरणस्नेही-सांस्कृतिक उद्यान, बीसीसीएल, केनापारा पर्यावरणस्नेही-पर्यटन स्थळ, अनन्यावाटिका, एसईसीएल, कृष्णशिला पर्यावरणस्नेही-पुनरुज्जीवन स्थळ, मुडवानी पर्यावरणस्नेही-उद्यान, एनसीएल, अनंता मेडिसिनल, एमसीएल, बाळ गंगाधर टिळक पर्यावरणस्नेही-उद्यान, डब्लूसीएल, चंद्रशेखर आझाद पर्यावरणस्नेही-उद्यान, सीसीएल ही कोळसा खाण पर्यटनात आणखी भर देणारी काही लोकप्रिय ठिकाणे आहेत.

"कोणी कल्पनाही केली नव्हती की एक निष्क्रीय खाण एका गजबजलेल्या पर्यटन स्थळात बदलू शकते. आम्ही नौकाविहाराचा आनंद घेत आहोत, नयनरम्य हिरवळीच्या सोबतीने सुंदर पाणवठे आणि तरंगत्या उपाहारगृहात दुपारचे जेवण घेत आहोत,” असे छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्यात एसईसीएलने विकसित केलेल्या केनापारा या पर्यावरणस्नेही-पर्यटन स्थळावर एका अभ्यागताने सांगितले.  "केनापारा येथे प्रचंड पर्यटन क्षमता आहे आणि आदिवासी लोकांसाठी उत्पन्नाचा एक चांगला स्रोत देखील आहे," असेही ते म्हणाले.

एसईसीएलने  केनपारा येथील बिश्रामपूर ओसी खाणीतील 6 क्रमांकाच्या निष्क्रीय खाणीत जलक्रीडा केंद्र आणि तरंगते उपाहारगृह उभारले आहे.

त्याचप्रमाणे, मध्य प्रदेशातील सिंगरौली येथील जयंतरिया येथे एनसीएलने नुकत्याच विकसित केलेल्या मुडवानी पर्यावरणस्नेही-उद्यानात नजरबंदी करणारी उद्याने उभारली आहेत. तसेच निसर्गरम्य देखावे, कारंजे आहेत.  "सिंगरौली सारख्या दुर्गम ठिकाणी, जिथे पाहण्यासारखे फारसे काही नाही, तिथे मुडवानी पर्यावरणस्नेही-उद्यान त्याच्या सुंदर निसर्गामुळे आणि इतर मनोरंजनाच्या सुविधांमुळे पर्यटकांची वर्दळ अनुभवत आहे," असे एका अभ्यागताने सांगितले.

मध्य प्रदेशातील सिंगरौली इथे जयंत परिसरात एनसीएलने विकसित केलेले मुडवानी पर्यावरणस्नेही-उद्यान

या व्यतिरिक्त, 2022-23 दरम्यान, सीआयएलने हरित पट्ट्याचा विस्तार 1610 हेक्टरपर्यंत वाढवून 1510 हेक्टर वार्षिक लागवडीचे उद्दिष्ट आधीच ओलांडले आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात 30 लाख रोपांची लागवड केली आहे. आर्थिक वर्ष 22 पर्यंत गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये, खाण लीज क्षेत्रात 4392 हेक्टर हिरवळीने 2.2 एलटी/वर्षाची कार्बन शोषून घेण्याची क्षमता निर्माण केली आहे.

सीआयएल आपल्या विविध खाणींमध्ये सीड बॉल वृक्षारोपण, ड्रोनद्वारे बियाणांची पेरणी आणि मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण यासारख्या नवीन तंत्रांचा देखील वापर करत आहे.  उत्खनन केलेले क्षेत्र, अधिक भरणी केलेले क्षेत्र इत्यादि सक्रीय खाण क्षेत्रांमधून विलग झाल्यानंतर लगेचच समावेशासाठी त्यावर पुन्हा दावा केला जातो. जैविक पुनरुत्थानासाठी विविध प्रजातींची निवड,  केंद्र आणि राज्य-अनुदानित तज्ञ संस्थाशी सल्लामसलत करून केली जाते. रिमोट सेन्सिंगद्वारे जमीन पुनर्संचयित आणि जीर्णोद्धाराचे निरीक्षण केले जात आहे आणि सध्या सुमारे 33% क्षेत्र हरित कवचाखाली आहे.

 

* * *

S.Patil/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1901101) Visitor Counter : 313