रेल्वे मंत्रालय
आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटना आणि रेल्वे संरक्षण दल यांच्या वतीने संयुक्तपणे 18व्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन
"रेल्वे सुरक्षा धोरण: भविष्यासाठी सज्जता आणि दृष्टीकोन " ही सुरक्षा परिषदेची संकल्पना
रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक आहेत आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटना सुरक्षा मंचाचे अध्यक्ष
Posted On:
20 FEB 2023 11:16AM by PIB Mumbai
जयपूर येथे 20 ते 23 फेब्रुवारी दरम्यान युनियन इंटरनॅशनल डेस केमिन्स डी फेर (यूआईसी) म्हणजेच आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटना (युआयसी) आणि रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ ) यांनी संयुक्तपणे 18 व्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन केले आहे.
युनियन इंटरनॅशनल डेस केमिन्स डी फेर (यूआयसी) म्हणजेच आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटना ही जगभरातील रेल्वे क्षेत्राचे प्रतिनिधित्व करते आणि रेल्वे वाहतुकीला प्रोत्साहन देते.रेल्वे संरक्षण बल ही भारतातील रेल्वे सुरक्षा क्षेत्रातील प्रमुख सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था आहे.
18 वी आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटना (युआयसी )जागतिक सुरक्षा परिषद 2023

भारताची प्रमुख रेल्वे सुरक्षा संस्था असल्याने, हे स्वाभाविक आहे की रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ )राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रेल्वे सुरक्षा क्षेत्रात देशाच्या प्रयत्नांचे नेतृत्व करते. आशिया, आफ्रिका आणि समान लोकसंख्याशास्त्रीय रचना असलेल्या इतर अनेक विकसनशील देशांमध्ये कार्यरत सदस्य संस्थांचा सहभाग वाढवण्यासाठी युआयसी द्वारे प्रदान केलेल्या बहुपक्षीय मंचाच्या माध्यमातून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल यासाठी युआयसी सुरक्षा मंचाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, रेल्वे संरक्षण बलाच्या महासंचालकांनी उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आणि भारताने जी -20 राष्ट्रांच्या समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारत अभिमानाने गुलाबी शहर जयपूरमध्ये आंतरराष्ट्रीय रेल्वे संघटनेच्या या 18 व्या जागतिक सुरक्षा परिषदेचे आयोजन करत आहे.
युआयसीच्या सदस्य संस्थांच्या प्रतिनिधींसोबत सहभागी होण्यासाठी आरपीएफ यजमान असेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात, भारताने आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा, सॉफ्ट-पॉवर आणि त्याची प्रगती योग्य आंतरराष्ट्रीय मंचांवर प्रदर्शित करण्याची गरज आहे. युआयसी जागतिक सुरक्षा परिषद ही अशीच एक विशेष संधी असेल.
18 वी जागतिक सुरक्षा परिषद ही , "रेल्वे सुरक्षा धोरण: भविष्यासाठी सज्जता आणि दृष्टीकोन'' या संकल्पनेवर आधारित आहे. युआयसी , भागीदार आंतरराष्ट्रीय संस्था, भारतीय रेल्वे, आरपीएफचे संबंधित अधिकारी आणि भारताचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त जगभरातील रेल्वे संघटनांचे सुरक्षा प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.या परिषदेत जगभरातील रेल्वे सुरक्षा प्रतिनिधींसाठी यजमानपद भूषवणे हा भारताला साजेसा असा कार्यक्रम असेल. जगभरातील रेल्वे सुरक्षेसाठीच्या चिंतेच्या मुद्द्यांवर आणि आव्हानांवर प्रभावी चर्चा करण्यासाठी आरपीएफ सज्ज आहे आणि द्वितीय क्रमावरील समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सत्रे तयार करण्यात आली आहेत, जेणेकरून जगभरातील रेल्वे सुरक्षेचा कायापालट घडवून आणणारे व्यावहारिक आणि तात्काळ अंमलबजावणी करण्यायोग्य उपाय शोधता येतील.
21 फेब्रुवारी 2023 रोजी उद्घाटन सत्राने ही परिषद सुरू होईल आणि 23 फेब्रुवारी 2023 रोजी समारोप सत्राने ही परिषद समाप्त होईल.उर्वरित परिषद "महत्वाची मालमत्ता आणि मालवाहतूक संरक्षण", "मानवी सुरक्षा दृष्टीकोन", "जगभरातील सर्वोत्तम रेल्वे सुरक्षा साधने आणि पद्धती" आणि "दृष्टिकोन 2030" या मूलभूत उप-संकल्पनांसह 4 सत्रांमध्ये विभागण्यात आली आहे.
यापूर्वी, 2006 आणि 2015 मध्ये, भारताच्या आरपीएफने नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय युआयसी जागतिक सुरक्षा परिषदेचे यजमानपद भूषवत यशस्वीपणे आयोजन केले होते. आरपीएफचे महासंचालक, संजय चंदर(भारतीय पोलीस सेवा ) यांनी जुलै 2022 ते जुलै 2024 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय युआयसी सुरक्षा मंचाचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला ही अतिशय अभिमानाची बाब आहे.
***
GopalC/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 1900713)
Visitor Counter : 1034