सांस्कृतिक मंत्रालय
मध्य प्रदेशात खजुराहो येथे 22 ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान G20 संस्कृती कार्यगटाच्या (सीडब्ल्यूजी ) पहिल्या बैठकीचे आयोजन होणार
भारताचा G20 संस्कृती ट्रॅक ' जीवनासाठी संस्कृती (कल्चर फॉर लाईफ ) या संकल्पनेवर आधारित - जे आहे शाश्वत जीवनासाठी पर्यावरण जागरूक जीवनशैलीचे अभियान : संस्कृती सचिव गोविंद मोहन
Posted On:
15 FEB 2023 7:06PM by PIB Mumbai
संस्कृती मंत्रालयाने 22 ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान मध्यप्रदेशात खजुराहो येथे G20 संस्कृती कार्यगटाच्या (सीडब्ल्यूजी) पहिल्या बैठकीचे आयोजन केले आहे.
“भारत संस्कृतीच्या बाबतीत इतका समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे की सांस्कृतिक संबंधांना स्वतःचे महत्त्व प्राप्त होते, असे संस्कृती मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी आगामी पहिल्या G20 संस्कृती कार्यसमुहाच्या (सीडब्लूजी ) बैठकीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले. "वसुधैव कुटुंबकम" - एक पृथ्वी • एक कुटुंब • एक भविष्य' ही . G20 ची मुख्य संकल्पना आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने "वसुधैव कुटुंबकम" या भारताच्या G20 संकल्पनेच्या प्रेरणेने सांस्कृतिक प्रकल्पांचा एक ठोस कार्यक्रम विकसित केला आहे, असे त्यांनी सांगितले. भारताचा G20 संस्कृती ट्रॅक जीवनासाठी संस्कृती (कल्चर फॉर लाईफ )' - शाश्वत जीवनासाठी पर्यावरण जागरूक जीवनशैली अभियान या संकल्पनेवर आधारित आहे , असे सचिव म्हणाले.
''खजुराहो येथील या संस्कृती कार्यगटाच्या बैठकीत महाराजा छत्रसाल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एक प्रदर्शनही भरवले जाणार असून या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्घाटन केंद्रीय संस्कृती मंत्री जी किशन रेड्डी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या हस्ते होणार आहे''., अशी माहिती संस्कृती सचिवांनी दिली.
यावेळी खजुराहो नृत्य महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसह अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असलेल्या पश्चिम समूह मंदिरानाही उपस्थित प्रतिनिधी भेट देतील.त्यांना पन्ना व्याघ्र प्रकल्पातही नेले जाईल. या बैठकीला 125 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती गोविंद मोहन यांनी दिली.
भारतातील चार ऐतिहासिक शहरांमध्ये संस्कृती कार्यगटाच्या चार बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत आणि या बैठकांच्या माध्यमातून चार प्राधान्य क्षेत्रांवरील G20 संवाद पुढे नेला जाईल. भारताचा संस्कृती कार्यगट जागतिक मंचावर एक प्रमुख संकल्पनेच्या रूपात संस्कृतीचा उदय प्रतिबिंबित करेल,सर्व स्तरांवर बहुपक्षीय आणि बहु-सांस्कृतिक सहकार्यामध्ये नवचैतन्य आणण्यासाठी 'संस्कृती' स्वीकारेल आणि हा आदर्श पुढे नेण्याचे आणि भविष्यातील जागतिक सांस्कृतिक धोरणे आणि उपक्रमांची माहिती देण्याचे या कार्यगटाचे उद्दिष्ट असेल.
***
ShaileshP/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1899737)
Visitor Counter : 237