मंत्रिमंडळ
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) आणि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इन इंग्लंड अँड वेल्स (ICAEW) यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
15 FEB 2023 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इन इंग्लंड अँड वेल्स यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मंजुरी दिली आहे.
या सामंजस्य कराराचा उद्देश परस्परांच्या सदस्यांची पात्रता, प्रशिक्षणाला मान्यता देणे आणि प्रचलित अटी आणि शर्तींनुसार एक समन्वय यंत्रणा विहित करून सदस्यांना प्रवेश देणे हा आहे. या सामंजस्य करारातील दोन्ही पक्ष एकमेकांना त्यांच्या पात्रता/प्रवेश आवश्यकता, सीपीडी धोरण, सवलती आणि इतर कोणत्याही संबंधित बाबींमधील बदलांची माहिती देतील.
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आणि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स इन इंग्लंड अँड वेल्स यांच्यातील सहकार्यामुळे ब्रिटनमधील भारतीय सनदी लेखापाल तसेच ब्रिटनमध्ये जागतिक व्यावसायिक संधीच्या शोधात असलेल्या भारतीय सनदी लेखापालांना मोठ्या प्रमाणात व्यावसायिक संधी उपलब्ध होतील.
S.Bedekar/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1899513)
Visitor Counter : 216
Read this release in:
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam