आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या प्रमुखांनी असंवेदनशील टिप्पणी केल्याचे वृत्त दिशाभूल करणारे
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा संचालनालय एक भाग असून वैद्यकीय आणि परिचारक व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी समन्वयाचे करते कार्य
Posted On:
15 FEB 2023 2:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2023
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या (डीजीएचएस) प्रमुखांनी परिचारिकांविरुद्ध ‘असंवेदनशील टिप्पणी’ केली, अशा आशयाचे ‘द मॉर्निंग स्टँडर्ड’ मध्ये देण्यात आलेली बातमी दिशाभूल करणारी आहे. परिचारिका समुहाने केलेल्या मागण्यांच्या निवेदनावर काही दिवसांपूर्वी वादग्रस्त भाष्य करण्यात आले होते, त्यामुळे परिचारिका व्यवसायाबाबत सहानुभूती नसल्याचा ठपका, या वृत्तामध्ये ठेवला गेला आहे.
परिचारकांसह इतर सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक बाबींसाठी, आरोग्य सेवा महासंचालनालय (डीजीएचएस यांच्या नेतृत्वाखाली) तांत्रिक भांडाराचे कार्य करते. आणि मंत्रालयाला विशिष्ट कार्यक्षेत्रातील, त्याचबरोबर -विशिष्ट तांत्रिक आवश्यक गोष्टींचा पुरवठा करते.
आरोग्याच्या क्षेत्रामध्ये , परिचारकांच्या बाबी, धोरणात्मक निर्णय आणि त्यांची कार्यक्रमात्मक अंमलबजावणी ही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची जबाबदारी आहे. कामाच्या या विभागणीमुळे आरोग्य सेवा महासंचालनालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्यात सुसंवादाचे संबंध निर्माण होतात.
सध्या, आरोग्य सेवा महासंचालनालयामध्ये परिचारक क्षेत्राशी संबंधित तीन तांत्रिक पदे आहेत. त्यामध्ये परिचारक सल्लागार, एडीजी (नर्सिंग), उप. सहाय्यक डीजी (नर्सिंग) आणि डेप्युटी नर्सिंग सल्लागार यांचा समावेश आहे. ही तांत्रिक पदे आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून आरोग्य मंत्रालयाकडे हस्तांतरित करावीत, अशी मागणी काही परिचारकांच्या संघटना करीत आहेत. आरोग्य सेवा महासंचालनालयाद्वारे प्रदान केलेली तांत्रिक सल्ल्याची सध्याची प्रणाली आणि मंत्रालयाद्वारे कार्यक्रमात्मक अंमलबजावणी केली जात असल्याने समाधानकारक रीतीने काम सुरू असल्यामुळे , ही तांत्रिक पदे आरोग्य सेवा महासंचालनालयाकडून मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्याच्या बाजूने आरोग्य मंत्रालय नाही.
आरोग्य सेवा महासंचालनालय हे नर्सिंग व्यवसायाबाबत अत्यंत संवेदनशील आहे आणि वैद्यकीय व्यवसायात परिचारकांना योग्य स्थान मिळावे, अशी इच्छाही या विभागाची आहे. परिचारिकांचा एक गट, आरोग्य सेवा महासंचालनालयाद्वारे कार्यरत असलेल्या चार तांत्रिक नर्सिंग पदांवर समाधानी नाही आणि ही पदे मंत्रालयाकडे हस्तांतरित करावीत, अशी त्यांची इच्छा आहे. यासंदर्भात आलेल्या बातम्यांच्याबाबतीत संबंधित परिचारक संघटनेला डीजीएचएसने प्रतिसाद दिला आहे. संचालनालयाने या संदर्भातील निवेदनात सर्व परिस्थिती स्पष्ट केली आहे. तसेच डीजीएचएसने ठाम विश्वासाने सांगितले आहे की, त्यांचे संचालनालय हे मंत्रालयाचा अविभाज्य भाग आहे आणि परिचारिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयाच्या ‘नर्सिंग प्रोग्राम डिव्हिजन’ सोबत काम करत आहे.
G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1899413)
Visitor Counter : 150