संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एअरो इंडिया 2023 मध्ये संरक्षण सचिवांनी अनेक संरक्षण शिष्टमंडळांशी केली चर्चा

Posted On: 15 FEB 2023 9:02AM by PIB Mumbai

बंगळुरू येथे एअरो  इंडिया 2023 च्या निमित्ताने संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी 14 फेब्रुवारी 2023 रोजी  अनेक संरक्षण शिष्टमंडळांची भेट घेतली.

संयुक्त अरब अमिरातीचे संरक्षण सचिव मतर सालेम अली मारान अल्दाहेरी यांच्या नेतृत्वाखालील युएई शिष्टमंडळासोबत त्यांची द्विपक्षीय बैठक झाली. त्यांनी विद्यमान  संरक्षण सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आणि लष्कराच्या एअरो इंडिया मधील  नियमित सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले.

संरक्षण सचिवांनी म्यानमारचे संरक्षण उद्योग प्रमुख लेफ्टनंट जनरल कान मिंट थान यांच्या नेतृत्वाखालील  शिष्टमंडळाची भेट घेतली. या बैठकीत सध्या सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

संरक्षण सचिवांची ब्राझील सोबत द्विपक्षीय बैठक झाली. ब्राझीलच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संरक्षण उत्पादन सचिवालयाचे प्रमुख मेजर ब्रिगेडियर रुई चागास मेस्किटा यांनी केले. त्यांनी संरक्षण संबंधी औद्योगिक सहकार्याच्या अनेक मुद्द्यांवर तसेच सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या  शक्यतांबाबत चर्चा केली.

संरक्षण सचिवांनी कंबोडियाच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे  सचिव जनरल युन मिन यांच्या नेतृत्वाखालील  शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांनी दोन्ही देशांमध्ये  सध्या सुरु असलेल्या सहकार्याचा आढावा घेतला आणि संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उपायांवर चर्चा केली.

बल्गेरियाच्या संरक्षण उपमंत्री  कॅटरिना  ग्रामॅटिकोवा यांच्यासोबत संरक्षण सचिवांच्या द्विपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षण औद्योगिक सहकार्याशी संबंधित मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली.

मॉरिशसचे पंतप्रधान कार्यालयाचे स्थायी सचिव केचन बालगोबिन यांच्या नेतृत्वाखाली मॉरिशसच्या शिष्टमंडळाने संरक्षण सचिव  गिरीधर अरमाने यांची भेट घेतली. त्यांनी विद्यमान तसेच भविष्यातील संरक्षण सहकार्याच्या बाबीविचारात घेतल्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली.

 ***

Gopal C/Sushma/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1899307) Visitor Counter : 196