रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने रेल कौशल विकास योजने अंतर्गत 15000 पेक्षा जास्त उमेदवारांना दिले प्रशिक्षण
रेल्वे कौशल्य विकास योजनेच्या, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये, युवकांची रोजगारक्षमता आणि उद्योजकता वाढविण्यासाठी देण्यात आले विविध व्यवसायांचे तांत्रिक प्रशिक्षण
Posted On:
14 FEB 2023 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 14 फेब्रुवारी 2023
युवकांना रेल्वे प्रशिक्षण संस्थांमध्ये प्राथमिक पातळीवरील कौशल्य प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी, भारतीय रेल्वेद्वारे, “रेल कौशल विकास योजना” (RKVY) अधिसूचित करण्यात आली आहे. बनारस लोको वर्क्स, वाराणसीला रेल कौशल विकास योजने अंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रमाचे समन्वय/आयोजन करण्यासाठी नोडल पीयु म्हणून नामांकित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण सप्टेंबर 2021 मध्ये संपूर्ण भारतात सुरु झाले असून आतापर्यंत, 23,181 उमेदवारांनी रेल कौशल विकास योजने अंतर्गत नोंदणी केली आहे आणि 15,665 उमेदवारांनी त्यांचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
या योजनेंतर्गत, चौदा (14) उद्योगांशी संबंधित, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, मशिनिस्ट, फिटर इ. यासारखे तांत्रिक पातळीवरील प्रशिक्षण दिले जाते. भारतीय रेल्वे मार्गांवरील दुर्गम स्थानांसह साधारणपणे एकापेक्षा जास्त राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या 94 प्रशिक्षण केंद्रांवर हे प्रशिक्षण दिले जाते. देशाच्या कोणत्याही भागातील उमेदवार या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ शकतात. उमेदवारांना हे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते. रेल कौशल विकास योजनेच्या (RKVY) देखरेखीसाठी एक समर्पित वेबसाइट विकसित करण्यात आली आहे. तथापि, ही योजना, भारतातील बेरोजगार तरुणांना त्यांची रोजगारक्षमता आणि उद्योजकता वाढविण्यासाठी विविध व्यवसायांमध्ये तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठीचा कौशल्य विकास कार्यक्रम आहे.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1899240)