कृषी मंत्रालय
इंदूरमधल्या जी-20 बैठकीच्या पहिल्या दिवशी प्रतिनिधींनी शहरातल्या वारसा स्थळांचा केला दौरा
ऐतिहासिक राजवाड्याला दिली भेट तसेच स्थानिक संस्कृती आणि खाद्यपदार्थांचा घेतला आनंद
प्रविष्टि तिथि:
13 FEB 2023 5:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
इंदूरमधल्या जी-20 कृषी कार्यगटाच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी वारसा स्थळांचा दौरा केला.

या प्रतिनिधींनी इंदूरच्या ऐतिहासिक होळकर राज्याच्या छत्र्या आणि राजवाड्याला भेट दिली.

प्रतिनिधींनी स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आनंद घेतला.

बोलिया सरकार स्मारक छत्री येथून सुरु झालेली सांस्कृतिक स्थळदर्शन सफर कृष्णपुरा छत्री मार्गे राजवाडा येथे पोहोचली.

त्यानंतर, या प्रतिनिधींनी पत्रकारांशी संवाद साधला.
या वारसा स्थळ भेटी दौरा दरम्यान जिल्हा प्रशासन आणि कृषी मंत्रालयाचे अधिकारी या प्रतिनिधींसोबत होते.

N.Chitale/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1898856)
आगंतुक पटल : 236