संरक्षण मंत्रालय
नारी शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी भारतीय नौदलाची महिलांची कार रॅली - ‘शी इज अनस्टॉपेबल’
प्रविष्टि तिथि:
13 FEB 2023 3:38AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2023
देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अमृत काळा’चे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी देशातील नारीशक्तीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरेल यावर भर दिला.
पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेनुसार, ‘नारी शक्ती’बाबत जागरूकता वाढवण्यासाठीचा प्रयत्न म्हणून भारतीय नौदल तसेच नौदल स्वास्थ्य आणि कल्याण ही संघटना (एनडब्ल्यूडब्ल्यूए)सर्व महिला संचालित मोटर मोहिमेच्या आयोजनासाठी जीप इंडिया या कंपनीशी सहकारी संबंध प्रस्थापित करत आहे. देशभरातील तसेच भारतीय नौदलातील साहसी महिलांना आदरांजली म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘शी इज अनस्टॉपेबल’ या घोषवाक्यासह आणि ‘सोअर हाय’ या टॅग लाईनसह ही महिलांची कार रॅली नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युध्द स्मारकापासून सुरु होऊन राजस्थानातील लोंगेवाला येथील युद्ध स्मारकापर्यंत प्रवास करेल. 14 ते 25 फेब्रुवारी 2023 या 12 दिवसांच्या काळात ही कार रॅली दिल्ली-राजस्थान-दिल्ली असा प्रवास करेल. दिल्लीला परतण्यापूर्वी ही रॅली जयपूर,बिकानेर,जैसलमेर,लोंगेवाला,जोधपुर, उदयपुर या शहरांतून जाईल. ही कार रॅली एकूण 2300 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. या कार रॅलीच्या आयोजनाचे खालील उद्देश आहेत:-
(a)स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षे साजरी करणे
(b)नौदलातील महिला अधिकाऱ्यांच्या योगदानाचे प्रदर्शन घडवणे
(c)देशातील महिलांना भारतीय नौदलामध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे
(d)लोंगेवाला युद्ध स्मारकापाशी आदरांजली वाहणे
(e)या रॅली मार्गातील शहरांमध्ये असणारे माजी नौदल अधिकारी / वीर नारी यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणे
(f)एनडब्ल्यूडब्ल्यूए दिन सोहोळ्याचा भाग म्हणून एनडब्ल्यूडब्ल्यूए संपर्क उपक्रम आयोजित करणे
राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून निघणाऱ्या या रॅलीला नौदल प्रमुख अॅडमिरल आर.हरी कुमार यांच्या हस्ते आभासी पद्धतीने तर एनडब्ल्यूडब्ल्यूएच्या अध्यक्षा कला हरी कुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाईल.
या रॅलीच्या प्रवासादरम्यान एनडब्ल्यूडब्ल्यूएच्या अध्यक्ष तसेच इतर सदस्य विशेष मुलांसाठीच्या शाळा, वृद्धाश्रम तसेच अनाथालयात विशेष संपर्क कार्यक्रम राबवतील तसेच माजी अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. यावेळी, भारतीय नौदलामध्ये उपलब्ध असलेल्या कारकीर्दीच्या संधीबद्दल माहिती देणाऱ्या जागृती कार्यक्रमांचे महिला नौदल अधिकाऱ्यांतर्फे आयोजन केले जाईल. मान्यताप्राप्त शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या अधिकाऱ्यांतर्फे नौदलात समाविष्ट होण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या अग्निवीर तसेच इतर योजनांबद्दल माहिती देणाऱ्या विशेष प्रेरक भाषणांचे आयोजन करण्यात येणार आहे.
जीप इंडिया या कंपनीसह, ईव्हीओ इंडिया, फेमिना तसेच मॅरिएट समूह देखील नौदलाच्या या महिला संचालित कार रॅलीच्या आयोजनाचे भागीदार आहेत. तसेच या उपक्रमाला ॲपेरल इंडिया, डीएलएफ प्रॉमनेड आणि लक्झॉटिका समूह यांचे पाठबळ लाभले आहे.
R5BI.jpg)
S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1898782)
आगंतुक पटल : 224