कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या जी 20 अध्यक्षतेखाली कृषी कार्यगटाच्या पहिल्या कृषी प्रतिनिधी बैठकीचे यजमानपद भूषवण्यासाठी इंदूर सज्ज

Posted On: 12 FEB 2023 4:25PM by PIB Mumbai

 

इंदूर येथे 13-15 फेब्रुवारी 2023 दरम्यान पहिली कृषी प्रतिनिधी बैठक आयोजित करण्यात आली असून ही बैठक तीन दिवस चालेल. या बैठकीत जी 20 सदस्य देश, अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे सुमारे शंभर प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे.

या तीन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. भरड धान्ये  आणि त्याचे मूल्यवर्धित खाद्यपदार्थ यासह पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसायाचे स्टॉल्स हे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असेल.

कृषी कार्यगटाच्या पहिल्या कृषी प्रतिनिधी बैठकीच्या निमित्ताने , पहिल्या दिवशी कृषी क्षेत्राशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी दोन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुसऱ्या दिवशी केंद्रीय नागरी विमान वाहतूक  मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार असून सहभागी सदस्य आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सर्वसाधारण चर्चा होईल.

तिसऱ्या दिवशी कृषी कार्यगटाच्या विकास प्रक्रियेच्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होईल.  हे एक तांत्रिक सत्र असेल ज्यामध्ये सर्व संबंधित सदस्य आणि आंतरराष्ट्रीय संघटना चर्चेत सहभागी होतील.

कार्यक्रमादरम्यान, प्रतिनिधींना राजवाडा पॅलेसमध्ये हेरिटेज वॉक आणि मांडू किल्ल्याच्या सहलीद्वारे समृद्ध भारतीय इतिहास अनुभवता येईल. तसेच मेजवानी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे भारतीय खाद्यपदार्थ आणि संस्कृतीचा आस्वाद घेता येईल.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1898513) Visitor Counter : 253