महिला आणि बालविकास मंत्रालय
जर तुम्हाला तुमचे भविष्य सुयोग्य करायचे असेल, तुम्हाला भविष्यासाठी सज्ज व्हायचे असेल तर, चर्चेच्या आणि तुमच्या निर्णयांच्या केंद्रस्थानी महिला असाव्यात हे सुनिश्चित करावे लागेल - आग्रा येथे आयोजित जी -20 सक्षमीकरण (एम्पॉवर ) समूहाच्या उद्घाटन बैठकीच्या पहिल्या दिवशी महिला आणि बालविकास मंत्र्यांचे प्रतिपादन
Posted On:
11 FEB 2023 9:51PM by PIB Mumbai
आग्रा येथील ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये 11 आणि 12 फेब्रुवारी 2023 रोजी जी -20 सक्षमीकरण समूहाच्या उद्घाटन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शक आराखडा , धोरणे विकसित करण्याची संधी तसेच समानता आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्यासाठी समान सामर्थ्य एकत्रित करण्याची संधी या बैठकीच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे.
सर्व जी 20 देशांमध्ये महिलांच्या नेतृत्व आणि सक्षमीकरणाला गती देण्यासाठी व्यवसाय आणि सरकारांमधील सर्वसमावेशक आणि कृती-आधारित आघाडी करण्याचा जी -20 सक्षमीकरण (एम्पॉवर ) समूहाचा प्रयत्न आहे. "महिला उद्योजकता: समानता आणि अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ", "तळागाळासह सर्व स्तरावर महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य " आणि "शिक्षण-महिला सक्षमीकरण आणि मनुष्यबळ यामध्ये समान भागीदारीची गुरुकिल्ली ". ही भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील केंद्रित तीन क्षेत्रे आहेत.
जी -20 सक्षमीकरण समूहाच्या उद्घाटन बैठकीची सुरुवात जी 20 प्रतिनिधींच्या आग्रा या चैतन्यदायी शहरात केलेल्या भव्य स्वागताने झाली.
बैठकीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात शारीरिक आणि भावनिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी योगाभ्यासाच्या फायद्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या योग सत्राने झाली.
यानंतर महिला नेत्यांसोबत नाश्त्याच्या वेळी एक चर्चा झाली या दरम्यान , वेगळी वाट धरलेल्या भूमिकांमध्ये महिलांनी समोर आलेल्या आव्हानांवर मात केलेल्या त्यांच्या प्रेरणादायी गाथा अधोरेखित करण्यात आल्या. भारतातील काही सर्वात उद्यमशील महिलांच्या प्रत्यक्ष अनुभवांच्या सामायिकीकरणाच्या माध्यमातून या सत्रामध्ये त्यांच्या कर्तृत्वाच्या वेगवेगळ्या कथा अनुभवता आल्या.
''जर तुम्हाला तुमचे भविष्य सुयोग्य करायचे असेल, तुम्हाला भविष्यासाठी सज्ज व्हायचे असेल तर, चर्चेच्या केंद्रस्थानी आणि तुमच्या निर्णयांच्या केंद्रस्थानी महिला आहेत हे सुनिश्चित करावे लागेल,'' असे महिला आणि बाल विकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आपल्या प्रमुख भाषणात सांगितले.
भारताचे जी 20 अध्यक्षपद हा इतिहासातील एक कशाप्रकारे महत्वाचा क्षण कसा आहे यावरही त्यांनी लक्ष केंद्रित केले. भारत सर्वांच्या कल्याणासाठी व्यावहारिक जागतिक उपाय शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यास उत्सुक असून यातून 'वसुधैव कुटुंबकम' (किंवा 'जग एक कुटुंब आहे') ही भावना खऱ्या अर्थाने प्रकट होते , असे त्या म्हणाल्या. त्यांनी यावेळी विशेषतः भारतातल्या बचत गटांच्या प्रवासावर भर देत , तळागाळातील महिलांच्या नेतृत्वाचे महत्त्व आणि प्रत्येक महिलेला बँकिंग आणि वित्तीय सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केलेले प्रयत्न अधोरेखित केले. याशिवाय, त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील लिंग समावेशन निधी, प्रत्येक घरासाठी शौचालये बांधणे आणि मासिक पाळीदरम्यान स्वच्छता पद्धतीचा परिचय करून भारतातील लैंगिक न्यायाचा उल्लेख केला.
जागतिक मंदी, हवामान बदल आणि हवामान वित्तपुरवठ्याची गरज यासारख्या अनेक आव्हानांना तोंड देत असताना भारत जी 20 चे अध्यक्षपद कशाप्रकारे भूषवतो आहे यावर जी 20 शेर्पा अमिताभ कांत यांनी आपल्या विशेष भाषणात भर दिला. भारताचा विकासदर आणखी वाढवायचा असेल तर महिलांचे दरडोई उत्पन्न वाढवणे आणि त्यांना नेतृत्वाच्या पदांवर बसवणे आवश्यक आहे,या असे त्यांनी सूचित केले. महिला सक्षमीकरणासाठी भारताने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांवर अमिताभ कांत यांनी भर दिला.
जी 20 सक्षमीकरण (एम्पॉवर ) समूहाच्या उपक्रमांच्या शिफारशींना नेत्यांच्या प्रमुख घोषणापत्रात स्थान मिळू शकते आणि हे भारताच्या महत्त्वाकांक्षी परिणामांशी अनुरूप असेल असे त्यांनी नमूद केले.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1898401)
Visitor Counter : 248