ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसीने सलग 6 व्या वर्षी पटकावला 'एटीडी सर्वोत्कृष्ट पुरस्कार 2023'
Posted On:
08 FEB 2023 2:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2023
देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी असलेल्या एनटीपीसी लिमिटेडला, अमेरिकेच्या असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट (एटीडी),च्या वतीने दिल्या जाणाऱ्या 'एटीडी सर्वोत्कृष्ट पुरस्कार 2023' ने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रतिभा विकास क्षेत्रात आपलया उद्योगाची कामगिरी प्रदर्शित केल्याबद्दल एनटीपीसी लिमिटेडची हा पुरस्कार जिंकण्याची ही सहावी वेळ आहे.
नेहमीच सर्जनशील तंत्राच्या माध्यमातून कर्मचार्यांना कार्यरत ठेवणे हा एनटीपीसीच्या संस्कृतीचा मूलाधार आहे. हा पुरस्कार एनटीपीसीच्या समकालीन मनुष्यबळ व्यवहार पद्धतींची साक्ष आहे.
प्रतिभा विकासाद्वारे उद्योगाची कामगिरी प्रदर्शित करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांना एटीडी सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात येतो. कर्मचार्यांना त्यांचे कौशल्य संच वाढवण्यास सक्षम करणारी एक व्यवस्था तयार करण्यात एनटीपीसी यशस्वी झाली आहे.
पुरस्कारामध्ये जगभरातील लहान आणि मोठ्या खाजगी, सार्वजनिक आणि ना -नफा तत्वावर काम करणाऱ्या संस्थांचा समावेश आहे.
असोसिएशन फॉर टॅलेंट डेव्हलपमेंट, अमेरिका ही प्रतिभा विकास क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी संस्था आहे आणि एटीडीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा शिक्षण आणि विकासातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार म्हणून ओळखला जातो.
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1897303)
Visitor Counter : 150