पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

भारतीय ऊर्जा सप्ताहात पंतप्रधानांनी ‘ऑईल इंडिया’च्या हायड्रोजन बसला दाखवला हिरवा झेंडा

Posted On: 07 FEB 2023 7:29PM by PIB Mumbai

 

बंगलुरू येथे सुरू असलेल्या भारतीय उूर्जा सप्ताहामध्ये पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 6 फेब्रुवारी 2023 रोजी  ऑइल इंडिया लिमिटेडच्यावतीने  विकसित केलेल्या स्वदेशी  हायड्रोजन इंधन सेलवर चालणा-या  ई-बसला हिरवा झेंडा दाखवला.

राष्ट्रीय हायड्रोजन मिशन आणि भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत  अंतर्गत ऑईल इंडियाने त्यांच्या स्टार्टअप प्रोग्राम एसएनईएच (स्नेह) अंतर्गत स्वदेशी हायड्रोजन इंधन  सेलवर चालणारी बस विकसित केली आहे.

नवीन बससाठी इलेक्ट्रिक ड्राइव्ह आणि फ्युएल सेल अशा दोन्हींचा संयुक्त वापर केला जातो. इंधनासाठी वापरलेल्या सेलसाठी हायड्रोजनच्या मदतीने  वीज निर्मिती केली जाते आणि याच विजेवर  इलेक्ट्रिक मोटर चालते. तसेच  एक्सीलरेशन’  आणि ब्रेकिंग’  दरम्यान बॅक-अप पॉवर पुरवणारी सहायक बॅटरी देखील चार्ज केली जाते. 60 किलोवॅट क्षमतेचा इंधन सेल वीज निर्मितीसाठी प्रोटॉन एक्सचेंज मेम्ब्रेन (पीईएम) तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.  बसच्या टाकीची क्षमता 350 बार दाबाने 21.9 किलोग्रॅम आहे.

या बसमध्‍ये चालकासह 32 व्यक्ती बसू शकतीलअशी तिची रचना करण्यात आली आहे. तसेच बसमध्‍ये व्हील चेअरची सुविधा देण्यात आली आहे.

 

ऑइल इंडिया लिमिटेडविषयी माहिती -

ऑइल इंडिया लिमिटेड ही भारतातील तेल क्षेत्रामधील सर्वात जुनी शोध आणि उत्पादन करणारी कंपनी आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी कंपनी वचनबद्ध आहे. ऑइल इंडिया लिमिटेड (ओआयएल) म्हणजेभारतातील पेट्रोलियम उद्योगाच्या वाढीचे आणि विकासाचे प्रतीक आहे. कंपनी  कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्खनन आणि उत्पादन, द्रवीभूत पेट्रोलियम वायूचे उत्पादन आणि कच्चे तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या वाहतुकीमध्ये कार्यरत आहे.

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1897161) Visitor Counter : 132