युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पहिली युथ 20  इनसेप्शन मीटिंग 2023, अर्थात युवा उदय बैठक 2023 आसामच्या गुवाहाटी इथे  6 ते 8 फेब्रुवारी 2023 दरम्यान  होणार

Posted On: 05 FEB 2023 9:00PM by PIB Mumbai

 

जी 20  अंतर्गत पहिल्या युवा उदय बैठक 2023 चं यजमानपद आसाम भूषवणार आहे. गुवाहाटी इथे उद्या 6 ते बुधवार 8 फेब्रुवारी या कालावधीत, ही बैठक होईल.  आयआयटी-गुवाहाटी च्या विद्यापीठ प्रांगणात या बैठकीचं आयोजन केलं आहे. या संमेलनामुळे, विद्यार्थ्यांना जगभरातील लोकांसमोर आपापली मतं मांडण्याची तसच लोकांपर्यंत आपली मतं पोहोचवण्याची संधी मिळेल.

या संमेलनात,केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर Y20 प्रतिनिधींसोबत 'युवा संवाद' साधतील आणि त्यानंतर विविध संकल्पनांवर श्वेतपत्रिका जारी करतील . आसामचे मुख्यमंत्री  हिमंता बिस्वा शर्मा, आसाममधील विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांचे शोधनिबंध सादर करतील. या व्यतिरिक्त, आयआयटी गुवाहाटी च्या या संमेलनस्थळी तंत्रविषयक सत्रं आणि विविध चर्चासत्रं होतील. 

जी 20 समूह देशांमधील 150 हून जास्त युवा प्रतिनिधी तीन दिवसांच्या या संमेलनातील विविध बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. 12 हजारांहून जास्त महाविद्यालयीन तसच विद्यापीठांमधील विद्यार्थी देखील या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

Y20 हा उपक्रम, युवावर्गाला समकालीन आणि विद्यमान विषयांवर आपली मतं मांडण्याची संधी द्यायच्या, तसेच समस्यांचा ऊहापोह करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं कार्य करतो. भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात Y20 च्या कार्यक्रमांची पायाभरणी करण्याचं, सुरुवात करण्याचं काम, गुवाहाटी इथे 6 ते 8 फेब्रुवारी 2023  दरम्यान होणारं हे संमेलन करेल.

***

S.Kane/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1896490) Visitor Counter : 260