पंतप्रधान कार्यालय
जयपूर महाखेलमधे सहभागी होणाऱ्यांना 5 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान करणार संबोधित
Posted On:
04 FEB 2023 10:40AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 5 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता जयपूर महाखेल मधील सहभागी खेळाडूंना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.
जयपूर ग्रामीण विभागाचे लोकसभा खासदार श्री राज्यवर्धन सिंह राठोड 2017 पासून जयपूरमध्ये जयपूर महाखेलचे आयोजन करत आहेत.
या वर्षी कबड्डी स्पर्धेवर लक्ष केंद्रित करत असलेल्या या महाखेलची सुरुवात राष्ट्रीय युवा दिनी म्हणजे12 जानेवारी, 2023 रोजी झाली. यात जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील सर्व 8 मतदान क्षेत्रांतील 450 हून अधिक ग्रामपंचायती, नगरपालिका आणि प्रभागांमधील 6400 हून अधिक युवक आणि क्रीडापटूंनी सहभाग नोंदविला होता. महाखेल हा उपक्रम जयपूरच्या तरुणांना त्यांच्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी देते आणि त्यांना खेळ हा करिअरचा पर्याय म्हणून स्विकारण्यासाठी प्रेरणा देते.
***
M.Jaybhaye/S.Patgoankar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1896252)
Visitor Counter : 194
Read this release in:
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam