राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर), भारतीय नागरी लेखा सेवा, भारतीय संरक्षण लेखा सेवा, भारतीय रेल्वे लेखा सेवा आणि भारतीय टपाल आणि दूरसंचार (वित्त आणि लेखा) सेवेतील परिविक्षाधीन (प्रशिक्षणार्थी )अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Posted On: 03 FEB 2023 3:34PM by PIB Mumbai

 

भारतीय महसूल सेवा (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर), भारतीय नागरी लेखा सेवा, भारतीय संरक्षण खाते सेवा, भारतीय रेल्वे लेखा सेवा आणि भारतीय टपाल आणि दूरसंचार (वित्त आणि लेखा) सेवेतील परिविक्षाधीन (प्रशिक्षणार्थी) अधिकाऱ्यांनी आज (3 फेब्रुवारी, 2023) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

आपली प्रशासन प्रणाली अधिक कार्यक्षम, उत्तरदायी आणि पारदर्शक प्रशासन तसेच  विनाअडथळा सेवा वितरणाकडे वेगाने वाटचाल करत असल्याने, महसूल सेवा आणि विविध लेखा सेवा यापूर्वीपेक्षा खूप मोठी भूमिका बजावणार आहेत, असे  राष्ट्रपतींनी अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले. दोन दिवसांपूर्वी, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करण्यात आला यामध्ये आगामी आर्थिक वर्षासाठी सरकारच्या खात्यांचा लेखा अंदाज  मांडण्यात आला आहे.नागरिकांसाठी-विशेषत: तरुणांसाठी विकासाच्या संधी निर्माण करणे, सर्वसमावेशक विकास आणि अन्य अनेक राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करणे हे या अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. करदात्यांच्या पैशाचा प्रत्येक रुपया देशाच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी वापरला जाईल हे तुम्ही  सर्वांनी आपापल्या सेवांमध्ये जमाखर्च, लेखापरीक्षण आणि जमा खर्चाचा ताळमेळ राखत   सुनिश्चित केले पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाल्या.

सरकारच्या अप्रत्यक्ष करांच्या संकलनासाठी आणि प्रशासनासाठी ,एक जबाबदार अधिकारी म्हणून भारतीय महसूल सेवेच्या (सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर)  अधिकाऱ्यांना हे आव्हानात्मक काम आहे, आर्थिक वृद्धी  आणि सर्वसमावेशक विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे  कर अनुपालन सुनिश्चित करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले.

प्रशासनात उत्तरदायित्वाची अंमलबजावणी करण्यासाठी लेखा हे एक प्रमुख साधन आहे.एक सुदृढ सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली हा सुशासनाचा मोठा आधार आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. भारतीय नागरी, संरक्षण, रेल्वे तसेच  टपाल  आणि दूरसंचारलेखा सेवेच्या  अधिकार्‍यांवरएक बळकट आर्थिक व्यवस्थापन प्रणाली तयार करण्याची आणि देखरेख करण्याची जबाबदारी आहे ही प्रणाली सरकारचे कामकाज सुरळीत पार पाडण्यास मदत करते.त्यामुळे, या अधिकाऱ्यांची सरकारमधील  भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला अत्यंत वचनबद्धतेने आणि संबंधित कौशल्याचा वापर करून ही  जबाबदारी पार पाडावी लागेल, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

एखादे राष्ट्र आपल्या मनुष्यबळाच्या  बळावर प्रगती करत असते, या माध्यमातून  अन्य भौतिक संसाधने शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने एकत्रित करता येतात असे सांगत राष्ट्रपतींनी सर्व अधिकार्‍यांनी आपली कर्तव्ये सचोटीने आणि वचनबद्धतेने पार पाडावीत आणि राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन  केले.

राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1896005)