रेल्वे मंत्रालय
प्रवासी श्रेणीत रेल्वेच्या महसुलात 73% वाढ
रेल्वेने आरक्षित प्रवासी श्रेणीत 48% आणि अनारक्षित प्रवासी श्रेणीत 361% वाढ नोंदवली
Posted On:
02 FEB 2023 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2023
एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान भारतीय रेल्वेने प्रवासी श्रेणीमध्ये 54733 कोटी रुपये इतका एकूण अंदाजे महसूल मिळवला , गेल्या वर्षी याच कालावधीतील 31634 कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत 73 टक्के वाढ झाली आहे.
आरक्षित प्रवासी श्रेणीत , 1 एप्रिल 2022 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत रेल्वेचे आरक्षण केलेल्या प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या 6590 लाख असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 6181 लाखांच्या तुलनेत त्यात 7% वाढ झाली आहे. 1 एप्रिल 2022 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत आरक्षित प्रवासी श्रेणीतून प्राप्त महसूल 42945 कोटी रुपये आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 29079 कोटी रुपये होता, आणि यात 48% ची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
अनारक्षित प्रवासी श्रेणीत , 1 एप्रिल 2022 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीत रेल्वेचे आरक्षण केलेल्या प्रवाशांची एकूण अंदाजे संख्या 45180 लाख असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 19785 लाखांच्या तुलनेत त्यात 128% वाढ झाली आहे. 1 एप्रिल 2022 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीतला अनारक्षित प्रवासी श्रेणीतून प्राप्त महसूल 11788 कोटी रुपये आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत 2555 कोटी रुपये होता, आणि यात 361% ची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.,
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1895750)