अर्थ मंत्रालय
कोणालाही मागे न ठेवता 2014 पासून मिळविलेले यश
सरकारने 2014 पासून सर्व नागरिकांना चांगल्या दर्जाचे जीवनमान सन्मानाने दिले आहे - केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2023 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2023
2014 पासून सरकारने सन्मानाने सर्व नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे आणि दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून 1.97 लाख रूपये झाले आहे, असे आज संसदेत केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023-24 सादर करताना सांगितले. या 9 वर्षांत आपली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर आली आहे आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरण असलेला एक सुशासित आणि नाविन्यपूर्ण देश म्हणून अर्थव्यवस्थेत सुधारणा झाल्याचे जागतिक निर्देशांकातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. देशाने अनेक शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे, असेही त्या म्हणाल्या.

2022 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (इम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन- इपीएफओ) सदस्यसंख्या दुप्पट होऊन 27 कोटींवर आणि युपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस)द्वारे डिजिटल पेमेंट्स 126 लाख कोटींवरून 7,400 कोटी झाल्याने अर्थव्यवस्था औपचारिकपणे अधिक रचनात्मक झाली आहे, असे त्या पुढे म्हणाल्या. लक्ष्यित लाभांच्या सार्वत्रिकीकरणासह अनेक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या फलस्वरूप सर्वसमावेशक विकास झाला आहे, जसे की :
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 11.7 कोटी घरगुती शौचालये,
- उज्ज्वला अंतर्गत 9.6 कोटी द्रवरूप पेट्रोलियम वायू (एलपीजी) जोडणी
- 102 कोटी व्यक्तींना कोविड लसीकरणाच्या 220 कोटी लस मात्रा
- 47.8 कोटी पंतप्रधान जन धन बँक खाती,
- पंतप्रधान सुरक्षा विमा आणि पंतप्रधान जीवन ज्योती योजनेंतर्गत 44.6 कोटी लोकांसाठी विमा संरक्षण, आणि
- पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत 11.4 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 2.2 लाख कोटी रुपयांचे रोख हस्तांतरण
* * *
H.Raut/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1895577)
आगंतुक पटल : 273