अर्थ मंत्रालय

स्वच्छ ताळेबंदामुळे वित्तीय संस्थांकडून देण्यात येणाऱ्या कर्ज क्षमतेत वाढ

Posted On: 31 JAN 2023 10:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 जानेवारी 2023

 

गेल्या काही वर्षात ताळेबंद स्वच्छ राखण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या पावलांमुळे,  वित्तीय संस्थांकडून देण्यात येणाऱ्या कर्ज क्षमतेत वाढ झाली आहे. एप्रिल 2022 पासून अनुसूचित वाणिज्यिक बँकांकडून दिल्या जाणाऱ्या  अ खाद्य कर्जात दोन अंकी वाढ दिसून आल्याच्या मुद्याकडे 2022-23 च्या आर्थिक पाहणी अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत हा अहवाल मांडला.

गुंतवणूक चक्राला  बँकांच्या सुयोग्य स्थिती दर्शवणाऱ्या अहवालाची जोड,  बिगर बँकिंग वित्तीय  संस्थांचा भक्कम भांडवली पाया आणि देशांतर्गत  म्यूच्युअल फंडांच्या  अ‍ॅसेट अंडर  मॅनेजमेंट अर्थात गुंतवणूकदारांच्या वतीने कंपनी करत असलेल्या गुंतवणूकीच्या बाजार मूल्यात मोठ्या वाढीचे अमृत काळातले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी  वित्तीय व्यवस्थेला महत्वाची भूमिका बजावावी लागेल, असे अहवालात म्हटले आहे.  

मौद्रिक विकास

विकसित आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये 2022 मध्ये चलन फुगवटा आल्याने आखडते वित्तीय धोरण अवलंबावे लागले, ही बाब सर्वेक्षणात अधोरेखित करण्यात आली आहे. 

 

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0012165.jpg https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002JNZB.jpg

 

* * *

U.Ujgare/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1895266) Visitor Counter : 179