अर्थ मंत्रालय
सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा या सार्वजनिक आरोग्य प्रणालीसाठी आधारभूत केंद्र आहेत: आर्थिक सर्वेक्षण 2023
आयुष्मान भारत कार्यक्रमांतर्गत, 31 डिसेंबर 2022 पूर्वी 1.5 लाख आरोग्य आणि तंदुरूस्ती केंद्रे कार्यान्वित, ती प्राथमिक आरोग्य सेवेच्या बळकटीकरणाकडे नेणारी
मानवी संसाधनांमध्ये लक्षणीय वाढ, आरोग्य व्यवस्था उभारणीचा गाभा
Posted On:
31 JAN 2023 2:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2023
केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2022-23 मध्ये प्राथमिक आरोग्य सेवेला मध्यवर्ती मानले आहे आणि सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांना 'सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे आधारभूत केंद्र' म्हणून संबोधले आहे, प्रत्येकापर्यंत सार्वजनिक आरोग्य सेवांचे वितरण व्हावे यासाठी ही आधारभूत प्रणाली आहे. आरोग्यसेवा पायाभूत सुविधा या देशातील आरोग्य सेवा वितरण तरतुदी आणि कल्याणकारी यंत्रणा समजून घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचक आहे.
आर्थिक सर्वेक्षण अलीकडील आरोग्य क्षेत्रातील सुधारणांवर प्रकाश टाकते. या सुधारणांमुळे सार्वजनिक क्षेत्रातील आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आहेत. ग्रामीण भागात उपकेंद्रे (एससी), प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी) आणि सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) यांची संख्या वाढल्याने हे मोठ्या प्रमाणात दिसून येते. आयुष्मान भारत कार्यक्रमांतर्गत, 31 डिसेंबर 2022 पूर्वी 1.5 लाख आरोग्य आणि तंदुरूस्ती केंद्रे (HWCs) कार्यान्वित करण्यात आली आहेत. ती सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतात.
भारतातील ग्रामीण आरोग्य सेवा प्रणाली
आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये प्रगती
आर्थिक सर्वेक्षण 2023 हे मानवी संसाधने या आरोग्य सेवा उभारणीतील मुख्य घटकात झालेली लक्षणीय वाढ दर्शवतात , जो आरोग्य व्यवस्थेचा गाभा आहे. यामध्ये चिकित्सक, परिचारिका, फार्मासिस्ट, सुईणी, दंतवैद्य, संबंधित आरोग्य व्यावसायिक, समुदाय आरोग्य कर्मचारी, सामाजिक आरोग्य कर्मचारी आणि इतर आरोग्य सेवा प्रदाते, तसेच आरोग्य व्यवस्थापन आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश आहे.
Indicators
|
2014
|
2019
|
2020
|
2021
|
2022
|
Sub-centres (SCs)
|
152.3
|
157.4
|
155.4
|
156.1
|
157.9
|
Primary Health Centres (PHCs)
|
25.0
|
24.9
|
24.9
|
25.1
|
24.9
|
Community Health Centres (CHCs)
|
5.4
|
5.3
|
5.2
|
5.5
|
5.5
|
Doctors at PHCs
|
27.4
|
29.8
|
28.5
|
31.7
|
30.6
|
Total Specialists at CHCs
|
4.1
|
3.9
|
5.0
|
4.4
|
4.5
|
Auxiliary Nurse Midwife at SCs & PHCs
|
213.4
|
234.2
|
212.6
|
214.8
|
207.6
|
Nursing Staff at PHCs & CHCs
|
63.9
|
81.0
|
71.8
|
79.0
|
79.9
|
Pharmacists at PHCs & CHCs
|
22.7
|
26.2
|
25.8
|
28.5
|
27.1
|
Lab Technicians at PHCs & CHCs
|
16.7
|
18.7
|
19.9
|
22.7
|
22.8
|
(Numbers in thousands, as of March each year)
Source: Rural Health Statistics 2021-22, MoHWF
* * *
U.Ujgare/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1894966)
Visitor Counter : 875