महिला आणि बालविकास मंत्रालय

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या 31 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला करणार संबोधित


राष्ट्रीय महिला आयोगाने स्थापना दिनानिमित्त 'सशक्त नारी सशक्त भारत' या संक्ल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यक्रमाचे केले आयोजन

Posted On: 30 JAN 2023 11:11AM by PIB Mumbai

राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापना दिवसानिमित्त, दिल्लीत उद्या 31 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करणार आहेत. 

आपल्या अतुलनीय कामाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या कार्याला उजाळा देत त्याप्रीत्यर्थ, सोहळा साजरा करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून याची संकल्पना, 'सशक्त नारी सशक्त भारत' आहे. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती झुबिन इराणी आणि राज्यमंत्री,  डॉ. मुंजपारा महेंद्रभाई हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय आयोग, राज्य महिला आयोग, दूतावास, विधी क्षेत्रातील मान्यवर, महिला आणि बाल विकास विभाग, आमदार, विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी, लष्करी आणि निमलष्करी अधिकारी, राष्ट्रीय आणि राज्य  विधी सेवा प्राधिकरण, एनसीडब्लू सल्लागार समितीचे सदस्य, आयोगाचे माजी अध्यक्ष आणि सदस्य आणि स्वयंसेवी संस्था या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

आयोगाने, आपल्या 31 व्या स्थापना दिवसा निमित्त 31 जानेवारी 2023 ते 1 फेब्रुवारी 2023 या कालावधीत दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

दुसऱ्या दिवशी, अनेकांना प्रेरणा आणि सशक्तीकरणाचा मार्ग दाखवणाऱ्या असामान्य महिलांसोबत परिसंवादाचे आयोजन केले आहे. विविध सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील महिलांच्या निर्णय प्रक्रियेत आणि नेतृत्व भूमिकांमध्ये लैंगिक समानतेवर लक्ष केंद्रित करून विविध आणि वैविध्यपूर्ण संवादाची देवाणघेवाण करून या चर्चेच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आयोगाचे उद्दिष्ट आहे.

एनसीडब्लूची स्थापना जानेवारी 1992 मध्ये राष्ट्रीय महिला आयोग कायदा, 1990 अंतर्गत एक घटनात्मक संस्था म्हणून करण्यात आली होती. महिलांसाठीच्या घटनात्मक आणि कायदेशीर सुरक्षेचे पुनरावलोकन करणे, विधायक उपायांची शिफारस करणे, निवारण किंवा तक्रारींची सुविधा आणि सरकारला, स्त्रियांना भेडसावणाऱ्या प्रश्नांसबंधित धोरणांबाबत सल्ला देण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली होती. 

***

Radhika A/Vinayak/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1894622) Visitor Counter : 245