युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नेमबाजीसाठी माझ्या भावाने मला प्रेरित केले; मला मदत करण्यासाठी तो सदैव तत्पर - शिवा नरवाल

Posted On: 29 JAN 2023 5:17PM by PIB Mumbai

 

भारताच्या अव्वल नेमबाजांपैकी एक आणि टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मनीष नरवालने 2021 मध्ये नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करत टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देत इतिहास घडवला.

त्याच्या या पराक्रमाने त्याला प्रतिष्ठित खेलरत्न पुरस्कार तर मिळवून दिलाच पण शेकडो मुलांना नेमबाजी करायला आणि खेळाची आवड जोपासण्यासाठी प्रेरित केले.

पण 2021 च्या त्याच्या कामगिरीपूर्वी, मनीषने घरातल्या जवळच्या व्यक्तीला केवळ नेमबाजीच नाही तर त्याच्या पावलांवर पाऊल ठेवण्यासाठी आणि मैदानात स्वतःची छाप पाडण्यासाठी प्रेरित केले ती व्यक्ती म्हणजे त्याचा धाकटा भाऊ शिवा नरवाल

शिवाने, वर्ष 2020 च्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर पुन्हा 2021 च्या युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले. 17 वर्षीय शिवाने, गेल्या वर्षी इजिप्त वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही वरिष्ठ गटात पदार्पण केले होते आणि 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर आणि 8 व्या स्थानावर येत, पॅरिस ऑलिम्पिक कोटा जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता.

त्यानंतर त्याने जागतिक अजिंक्यपद पदक गमावल्यानंतरच्या आलेल्या निराशेचा उपयोग आशियाई एअरगन चॅम्पियनशिपमध्ये केला आणि पुरुषांच्या एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

मनीषने आता देशातील सर्वोत्कृष्ट पॅरा-शूटर म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले आहे, तर शिवाचे सध्याचे ध्येय केवळ खेलो इंडिया युथ गेम्समध्ये आणखी एक पदक जिंकणे नाही तर त्याची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक पूर्ण करणे हे आहे.

खेलो इंडिया युथ गेम्स 2022 साठी माझी पुन्हा निवड झाल्याबद्दल मला खरोखर आनंद झाला आहे. भूतकाळातल्या, केआयवायजी (KIYG) 2020 आणि केआयवायजी (KIYG) 2021 मधील माझी कामगिरी खरोखरच चांगली राहिली आहे आणि मला आशा आहे की मध्य प्रदेशातही माझी कामगिरी चांगली राहील आणि मी हरियाणासाठी पुन्हा एकदा सुवर्णपदक जिंकेन.

मनीषचा भाऊ असल्याने काही अतिरिक्त दबाव आहे का असे शिवाला विचारले असता, 'तो नेहमी माझ्या मदतीसाठी तत्पर असतो.'

"माझी मोठी बहीण आणि भाऊ दोघेही नेमबाज असून मनीषची एअर पिस्तुल इव्हेंटमध्येधली चांगली कामगिरी पाहून मी सुद्धा नेमबाजी सुरू केली," असे शिव सांगतो.

त्यानंतर तो पुढे म्हणाला की, "मला शुटिंगमध्ये काही अडचण आली तर मनीष नेहमीच मला मदत करतो आणि मदतीसाठी तो नेहमीच तत्पर असतो."

मागच्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शिवाने पात्रता फेरीत 588 गुण मिळवत वर्चस्व गाजवले होते, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या त्याचा सहकारी सम्राट राणापेक्षा तो पाच गुणांनी आघाडीवर होता. या स्पर्धेत त्याने नंतर सुवर्णपदक जिंकले होते, त्याचवेळी त्याची बहीण शिखा नरवाल हिने मुलींच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1894484) Visitor Counter : 210