कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भरडधान्याबाबत दक्षिण देशांमधील सहकार्य पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभिलाक्ष लिखी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ आज नायजेरियाची राजधानी अबुजा येथे पोहचले


आफ्रिका खंडातील, 54 देशांमधला दुसरा सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला नायजेरिया, भरडधान्याबाबतच्या दक्षिण देशांच्या सहकार्याचा आदर्श ठरु शकतो- लिखी

Posted On: 26 JAN 2023 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 जानेवारी 2023

 

भरडधान्याबाबत जगातील दक्षिणी देशांमधील सहकार्य पुढील टप्प्यावर नेण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभिलाक्ष लिखी यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय भारतीय शिष्टमंडळ आज नायजेरियाची राजधानी अबुजा येथे पोहचले आहे.

भरडधान्य केन्द्रित चार दिवसांचा नायजेरिया दौरा 26 जानेवारी ते 29 जानेवारी 2023 या काळात होणार आहे. या दौऱ्यासाठी निघताना जारी केलेल्या निवेदनात लेखी म्हणाले की, भारताच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (आयवायएम) 2023 च्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश आणि भारतीय दूतावासांनी हाती घेतलेल्या केंद्रित उपक्रमांसह वर्षाच्या पहिल्या दिवसापासून यावर काम सुरु आहे.

आफ्रिका खंडातील, 54 देशांमधला दुसरा सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेला नायजेरिया देश, इजिप्त, दक्षिण आफ्रिका, अल्जेरिया, मोरोक्को, इथिओपिया, केनिया, अंगोला, घाना आणि सुदान यासारख्या भारताच्या इतर महत्त्वाच्या भागीदारांसह, आफ्रिका खंडापुढील सर्वात बिकट आव्हान असलेला, "अन्न सुरक्षेचा अभाव" दूर करण्यासाठी, भरडधान्याबाबतच्या दक्षिणी देशांच्या सहकार्याचा आदर्श ठरु शकतो. भारत आणि आफ्रिकेचे परस्परांना पूरक क्षेत्रीय प्राधान्यक्रम आणि विकसित होत असलेल्या जागतिक अन्न बाजारपेठेतील समान भूमिका, कृषी क्षेत्र आणि विशेषत: भरडधान्य उत्पादन तसेच प्रोत्साहन क्षेत्रात सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात.

ठळकपणे सांगायचे तर, 140 पेक्षा जास्त देशांतील भारतीय दूतावास 2023 मध्ये आयवायएमच्या उत्सवात सहभागी होतील.  आयवायएमच्या पार्श्वभूमीवर परदेशस्थ भारतीयांनाही सहभागी करून घेत प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्रे, पॅनेल चर्चा यासह स्थानिक संस्था, खाद्यपदार्थांवर लिहिणारे फूड ब्लॉगर्स, खाद्य पदार्थांचे आयातदार आणि स्थानिक रेस्टॉरंट इ. यांना सहभागी करुन विविध उपक्रम राबवले जातील.

 

 

R.Aghor/V.Ghode/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 


(Release ID: 1893981) Visitor Counter : 416