शिक्षण मंत्रालय
कला उत्सव विजेत्यांसह 200 विद्यार्थी आणि शिक्षक उद्या नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रजासत्ताक दिन संचलनाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार
पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चामधील हे सहभागी 29 जानेवारीला बीटिंग रिट्रीट सोहळ्याला देखील उपस्थित राहतील
आपल्या समृद्ध वारशाची ओळख करून घेण्यासाठी ते राजघाट, सदैव अटल, पंतप्रधान संग्रहालय, कर्तव्य पथ इत्यादींना भेट देतील
Posted On:
25 JAN 2023 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023
कला उत्सवच्या विजेत्यांसह 200 विद्यार्थी आणि पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी होणारे विविध राज्यांचे विद्यार्थी आणि शिक्षक 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिन संचलन सोहळा तसेच 29 जानेवारी 2023 रोजी बीटिंग रिट्रीट सोहळ्याला उपस्थित राहतील. प्रजासत्ताक दिन संचलना दरम्यान या मुलांना कर्तव्य पथ वरील आसन कक्ष 18 मध्ये बसवले जाईल.
दिल्लीतील परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना आपल्या समृद्ध वारशाची ओळख करून देण्यासाठी राजघाट, सदैव अटल, पंतप्रधान संग्रहालय, कर्तव्य पथ इत्यादी राष्ट्रीय महत्त्वाच्या ठिकाणी नेण्यात येईल.
'परीक्षा पे चर्चा' ही पंतप्रधानांनी संकल्पना असून यामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक त्यांच्याशी जीवनाशी आणि परीक्षांशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधतात. या वर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजता तालकटोरा इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे होणार आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन आणि इतर प्रमुख दूरचित्रवाणी वाहिन्यांवर केले जाईल.
यावर्षी सुमारे 38.80 लाख नोंदणी झाली असून त्यापैकी 16 लाखांहून अधिक नोंदणी राज्य मंडळांच्या शाळांमधील आहे. 2022 च्या परीक्षा पे चर्चा मध्ये झालेल्या नोंदणी (15.73 लाख) पेक्षा ही नोंदणी दुपटीने अधिक आहे. 155 देशांमधून ही नोंदणी करण्यात आली आहे.
27 जानेवारी 2023 रोजी देशभरातील 102 विद्यार्थी आणि शिक्षक तसेच कला उत्सव स्पर्धेतील 80 विजेते विशेष अतिथी म्हणून मुख्य कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1893790)
Visitor Counter : 189