राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती उद्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करणार

Posted On: 24 JAN 2023 6:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023

 

राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू उद्या (25 जानेवारी 2023) 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करणार आहेत.

राष्ट्रपतींचा संदेश संध्याकाळी सात (1900) वाजल्यापासून आकाशवाणीच्या (एआयआर) संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्कवर आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर हिंदीमध्ये प्रसारित केला जाईल आणि त्यानंतर इंग्रजीतील संदेश प्रसारित होईल.  दूरदर्शनवरील हिंदी आणि इंग्रजीमधील प्रसारणानंतर दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे संदेशाचे प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारण केले जाईल. आकाशवाणीवर रात्री साडेनऊ (2130) वाजल्यापासून संबंधित प्रादेशिक नेटवर्कवर प्रादेशिक भाषेतील संदेश प्रसारित केला जाईल.     

 

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1893342) Visitor Counter : 182