पंतप्रधान कार्यालय

पराक्रम दिनानिमित्त संसदेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली म्हणून आयोजित समारंभात सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आलेल्या तरुणांशी, ‘‘तुमच्या नेत्याबद्दल जाणून घ्या’ कार्यक्रमांतर्गत 7, लोककल्याण मार्ग येथे पंतप्रधानांनी साधला संवाद


पंतप्रधानांनी तरुणांशी मनापासून आणि मुक्तपणे संवाद साधला

पंतप्रधानांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर आणि त्यातून आपण काय शिकू शकतो यावर चर्चा केली

ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या आयुष्यात कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागले आणि त्यांनी या आव्हानांवर कशी मात केली हे जाणून घेण्यासाठी तरुणांनी त्यांचे आत्मचरित्र वाचण्याचा पंतप्रधानांनी दिला सल्ला

पंतप्रधानांना भेटण्याची आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात बसण्याची अनोखी संधी मिळाल्याबद्दल तरुणांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले

Posted On: 23 JAN 2023 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जानेवारी 2023

 

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस  यांना आदरांजली म्हणून आयोजित सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निवड झालेल्या तरुणांशी ‘तुमच्या नेत्याबद्दल जाणून घ्या’ कार्यक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. 7, लोककल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी हा संवाद झाला.

पंतप्रधानांनी तरुणांशी मनापासून  आणि मोकळेपणाने संवाद साधला. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाचे विविध पैलू आणि त्यांतून  आपण काय शिकू शकतो यावर चर्चा केली. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांना त्यांच्या आयुष्यात  कोणत्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागले आणि त्यांनी या आव्हानांवर कशी मात केली हे जाणून घेण्यासाठी तरुणांनी त्यांची आत्मचरित्र वाचण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याची आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात  बसण्याची अनोखी संधी मिळाल्याबद्दल युवकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक व्यक्तींना भेटून  विविधतेत एकता म्हणजे काय हे समजल्याचे युवकांनी सांगितले.

भूतकाळातला हा एक स्वागतार्ह बदल आहे, यापूर्वी केवळ मान्यवरांना संसदेत राष्ट्रीय व्यक्तिमत्वांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आमंत्रित केले जात होते, मात्र देशभरातील या  80 युवकांना  नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी संसदेत आयोजित पुष्पांजली अर्पण कार्यक्रमासाठी  निवडण्यात आले. 'तुमच्या नेत्याला जाणून घ्या' कार्यक्रमांतर्गत त्यांची निवड करण्यात आली आहे, ज्यात संसदेत होणार्‍या पुष्पांजली सोहळ्याचा उपयोग महान राष्ट्रीय व्यक्तिमत्वांची  माहिती आणि योगदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून करण्यात आला आहे. दीक्षा (DIKSHA) पोर्टल आणि माय गव्ह (MyGov) वरील प्रश्नमंजुषा; जिल्हा आणि राज्य स्तरावर वक्तृत्व/भाषण स्पर्धा; आणि नेताजींचे जीवन आणि योगदान यावरील आंतर विद्यापीठ स्पर्धेसह विस्तृत, वस्तुनिष्ठ आणि गुणवत्तेवर आधारित प्रक्रियेद्वारे त्यांची निवड करण्यात आली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पुष्पांजली समारंभात 31 जणांना नेताजींच्या योगदानाबद्दल  बोलण्याची संधीही मिळाली . ते हिंदी, इंग्रजी, संस्कृत, मराठी आणि बांगला या पाच भाषांमध्ये बोलले.

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1893128) Visitor Counter : 185